पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे तसेच रासायनिक शेती पासून दूर जाण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले. त्या पार्श्वभूमीवर याच्याही पुढचे पाऊल म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर ने पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये नैसर्गिक शेती समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक एस. पी. किमोथी यांनी सर्व आयसीएआर संस्थाचालकांना आणि कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आय सी ए आर चा शिक्षण विभाग युजी / पीजी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि नैसर्गिक शेती तज्ञांशी सल्ला करून अभ्यासक्रम विकसित करेल.
तसेच 22 डिसेंबर च्या पत्रानुसार 16 डिसेंबर रोजी विव्रत गुजरात शिखर परिषदेच्या समापण समारंभात देशाला संबोधित करताना नैसर्गिक शेतीच्या मुद्यावर जोर दिला होता.
झिरो बजेट शेती
किमोथी यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देणाऱ्या कॅबिनेट सचिवालय या कडून प्राप्त झालेल्या संप्रेषणला उत्तर देताना सांगितले
शून्य बजेट नैसर्गिक शेती वर अभ्यासक्रम विकसित करणे आणि युजी आणि पीजे स्तरावरील पाठ्यपुस्तकांमध्ये ते समाविष्ट करणे देखील हायलाईट केले गेले आहे. या प्रकरणाची आयसीएआर मध्ये अधिक तपासणी करण्यात आली आणि या विषयावर संशोधन करण्यासोबतच अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याचे मान्य करण्यात आले.
( संदर्भ- हॅलो कृषी )
Published on: 30 December 2021, 11:52 IST