काल देशाचे लक्ष लागलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. असे असताना यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्यांनी यावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा आणि शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी यामधून शेतकऱ्यांचे हित बघितले असल्याचे म्हटले आहे.
देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हा हमीभावाने खरेदी करु, अशी महत्वपुर्ण घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली असल्याचे खोत म्हणाले. यामुळे देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. 'वन स्टेशन, वन प्रोडक्ट' या योजनेतून देशांमध्ये बाजारपेठेला चालना देण्याची भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी फायद्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करुन सेंद्रीय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे.
तसेच देशात अधिकाधिक शेतकऱ्यांचा शेतमाल हा कमी खर्चात आणि वेगाने बाजारपेठेत कसा पोहोचेल, यासाठी रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात उभे करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला असल्याचे खोत यांनी सांगितले. या अर्थसंकल्पातून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी बाराबलुतेदार यांच्या हाताला काम कसं मिळेल, उद्योगधंदे कसे उभे राहतील, त्यासाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी केली जाईल, हे डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, शेतीमध्ये आधुनिकीकरण आलं पाहिजे. त्यासाठी शेती विषयक महाविद्यालयचे जाळ उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टार्टअप योजनेसाठी नाबार्ड योजनेअंतर्गत तरुणांना थेट कर्जपुरवठा करण्याची घोषणा केल्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केलेला अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.
Published on: 02 February 2022, 10:01 IST