News

शेतीमध्ये सिंचनाला फार महत्व आहे. सिंचन हे शेतीचा आत्मा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्व शेतीव्यवसाया सिंचनावर आणि सिंचनाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून आहे. शेती मधून जास्त उत्पादन हवे असेल तर सिंचन वेळेवर आणि योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते.

Updated on 12 March, 2022 9:43 AM IST

शेतीमध्ये सिंचनाला फार महत्व आहे. सिंचन हे शेतीचा आत्मा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्व शेतीव्यवसाया सिंचनावर आणि सिंचनाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून आहे. शेती मधून जास्त उत्पादन हवे असेल तर सिंचन वेळेवर आणि योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते.

परंतु त्यासाठी सिंचनाच्या परिपूर्ण सुविधा असणेदेखील गरजेचे असते. दिवसेंदिवस शेतीमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञान आल्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली परंतु सिंचनाच्या क्षमतेमध्ये आणि एकूणच परिस्थिती मध्ये पाहिजे तेवढी वाढ अजूनही झालेली नाही.त्यामुळेपाणी नसल्याने उत्पादनावर थेट परिणाम होतो. परंतु कृषी शास्त्रज्ञांनी  एक अनोखे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. या तंत्रज्ञानाचे नाव आहे हायड्रोजेल तंत्रज्ञान  हे होय. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तंत्रज्ञान शेतात एकदा वापरायला सुरुवात केली म्हणजे अगदी कोरडवाहू हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना सिंचनाची अडचण जास्त प्रमाणात उद्भवत नाही. हे तंत्रज्ञान झारखंडच्या रांची येथील इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेझीनअँड ग्लुयेथे विकसित करण्यात आले आहे.

हायड्रोजेल तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय आहे?

 गवार पासून जो गोंद तयार केला जातो त्यामध्ये पाण्याची प्रचंड क्षमता असते. या तंत्रज्ञानामध्ये या गवारच्या गोंदची पावडर वापरली जाते. हे शेतात टाकल्यानंतर एक वर्षांपर्यंत शेतामध्ये राहते त्यानंतर हळूहळू त्याचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. त्यानंतर ते जमिनीत जिरते. जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा हायड्रोजेलमध्ये वापरण्यात येणारी पावडर  पाणी शोषून घेते.जेव्हा हे पाणी शोषले जाते तेव्हा ते जमिनीत खाली जात नाही. त्यानंतर जेव्हा पाऊस नसतो किंवा पावसाळा संपतो त्यावेळी या पावडर मध्ये असलेला ओलावा हा सिंचनासाठी उपयोगी ठरतो.

 या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची पद्धत

 जर हे तंत्रज्ञान शेतामध्ये वापरायचे असेल तर आगोदर शेताची चांगली नांगरट करून घ्यावी.त्यानंतर एका एकरात एक ते चार किलो हायड्रोजेल व्यवस्थित पसरावे. 

बागायती क्षेत्रात लागवड असेल तर वनस्पतीच्या मुळाजवळ हलका खड्डा करून हायड्रोजेल टाकावे. या ठिकाणी देखील दुष्काळात पाणी शोषून आद्रता सोडण्याच्या पद्धती वर हे काम करते. ह्याची बियाणे दुकानांमध्ये मिळते परंतु ऑनलाईन देखील मागवता येते.याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.(स्रोत-tv9मराठी)

English Summary: hydrojel technology is benificial and crucial in agri sector for irrigation
Published on: 12 March 2022, 09:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)