News

नमस्कार आपणही शेतकरी आहात का? मग तुम्हीही घेत असाल ना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा? मग हि बातमी तुमच्यासाठी खास आहे. केंद्रातील मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. ह्या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपया प्रमाणे एका वर्षात तीन हफ्ते दिले जातात. म्हणजे 6000 रु वार्षिक दिले जातात. ह्या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात.

Updated on 05 November, 2021 9:12 AM IST

शेतकरी मित्रांनो ह्या पीएम किसान चे आतापर्यंत 9 हफ्ते शेतकऱ्यांना भेटले आहेत आणि लवकरच दहावा हफ्ता देखील शेतकऱ्यांना भेटणार आहे. आता प्रश्न असा आहे की, शेतकरी पती पत्नी दोघेही ह्या योजनेसाठी अँप्लाय करतात, मग त्या दोघांना ह्या योजनेचा फायदा मिळेल काय? तुम्हाला हि हा प्रश्न पडला असेल हो ना! मग आज आपण ह्या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेऊया. शेतकरी मित्रांनो जर पती पत्नी ह्या दोघांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अँप्लिकेशन दिले असेल, तर ह्या योजनेद्वारे फक्त एकालाच म्हणजे पती किंवा पत्नी लाभ मिळेल. आणि जर दोघांनी अँप्लाय केल असेल आणि दोघांना ह्याचे पैसे देखील मिळाले असतील तर दोघांपैकी एकाला पैसे हे परत करावे लागतात.

 कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो ह्या योजनेचा फायदा

»पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा हा त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्याच्याजवळ, 2 हेक्टर म्हणजे 5 एकर बागायती शेती आहे.

»ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन  आहे, त्याच शेतकऱ्यांना ह्या योजनेचा फायदा मिळतो.

»शेतकरी मित्रांनो पण जर कोणी आयकर रिटर्न भरत असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधी ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही म्हणजे तो किंवा ती शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र नसणार आहे.

»या योजनेसाठी वकील, डॉक्टर, सीए इत्यादी अपात्र असतात ह्या लोकांना ह्या योजनेचा फायदा मिळत नाही.

 केव्हा भेटेल दहावा हफ्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हफ्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची माहिती प्रसार माध्यमाच्या द्वारे समोर येत आहे. 

असे सांगितलं जात आहे की दहावा हफ्ता हा 15 डिसेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. तसेच अशीही बातमी समोर येत आहे की, जो हफ्ता 2000 रुपयेचा होता तो आता वाढून 4000 रुपये होईल. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने ह्या गोष्टीवर अजून कोणतीही टिप्पणी केलेली नाही. जर 2000 रुपयाच्या जागेवर 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे राहील.

English Summary: husbund and wife can take benifit of pm kisaan samman nidhi yojana
Published on: 05 November 2021, 09:12 IST