News

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस शेतीवरील समस्या आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतजमीन कसणे अवघड झाले आहे. बँकांचे कर्ज आणि सावकारी कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनामध्ये देखील शेतकरी आत्महत्या मुद्दा चांगलाच गाजला आहे.

Updated on 24 August, 2022 2:29 PM IST

महाराष्ट्रात (Maharashtra) शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस शेतीवरील समस्या (Agricultural problems) आणि नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) शेतकऱ्यांना शेतजमीन कसणे अवघड झाले आहे. बँकांचे कर्ज आणि सावकारी कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनामध्ये देखील शेतकरी आत्महत्या मुद्दा चांगलाच गाजला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव येथील एका शेतकरी पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. दोघानींनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकाश वसंत दीक्षित (वय ३०) आणि अश्विनी (वय २६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

प्रकाश हा त्याच्या पत्नी आणि आईसोबत नायगाव येथील घरामध्ये राहत होते. प्रकाश यांच्याकडे फक्त साडे चार एकर जमीन होती. सातत्याने येत असलेली नैसर्गिक संकटे आणि घरची बिकट आर्थिक परिस्थिमुळे उदर्निर्वाह करणे अवघड झाले होते. त्यामुळे ते तणावात गेले होते असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

Gold Rate: सोन्या चांदीचे नवीन दर जाहीर! 4700 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोने; तपासा नवे दर...

प्रकाश आणि त्यांच्या पत्नी दररोज प्रमाणे झोपायला गेले होते. प्रकाश यांची एक लहान मुलगी आणि मुलगा आहे. तेही आजीकडे झोपले होते. प्रकाश आणि त्याची पत्नी सकाळी लवकर बाहेर न आल्यामुळे खोलीमध्ये डोकावले असता त्यांचे मृतदेह लटकल्याचे दिसले.

घरातील लोखंडी नळीला एकाच साडीने गळफास घेतल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. शिराढोण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून सोमवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली.

शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय; वाचा सविस्तर

शेती साथ देत नसल्यामुळे प्रकाश यांनी कर्ज (loan) फेडण्यासाठी साडे चार एकर जमिनीमधील दीड एकर जमीन विकली (Selling land) होती. तरीही त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर हटला नव्हता. पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असत. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या:
Green Pea Farming: ऑफ सीझनमध्ये वाटाणा पिकातून मिळेल भरघोस नफा; वापरा ही खास पद्धत...
Tur Rate: तूर उत्पादकांचे अच्छे दिन! बाजारात तुरीला विक्रमी दर, इतके दिवस राहणार तुरीचे दर तेजीत

English Summary: Husband and wife committed suicide
Published on: 24 August 2022, 02:29 IST