नाशिक : जे लाभार्थी रेशन कार्डला आपल्या आधार लिंक करणार नाहीत, त्यांचे १ फेब्रुवारीपासून रेशन मिळणे बंद होईल असा इशारा नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने दिल्यानंतर गेल्या महिन्यात जवळ-जवळ ५४ हजार ५८३ कार्डधारकांनी आपल्या आधार जोडणी करून घेतली आहे. मुदत संपल्यानंतर ५लाख ३८ हजार व्यक्ती आजही आधारच्या जोडणेशिवाय धान्य घेत आहे.
या कार्डधारकांना शेवटची संधी म्हणून शासनाने आधार लिंकिंगसाठी बुधवार म्हणजेच १० तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रेशनमध्ये मिळणाऱ्या धान्याचा लाभही गरजू लाभार्थ्यांना मिळावा याबरोबरच लाभार्थ्यांची जोडणी असावे यासाठी अन्न व पुरवठा विभागाने या यंत्रणेची संगणीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण जानेवारी महिन्यात कार्डधारकांना जोडणी करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. रेशन दुकानदार देखील यासंबंधीची माहिती ग्राहकांना देत आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सध्या १ लाख 34 हजार अंत्योदय कार्डधारक असून ८ लाख ५० हजार प्रधान्य कुटुंबातील कार्डधारक आहेत. यापैकी जवळ-जवळ ९८.६७ टक्के कार्डधारकांच्या आधार लिंक पूर्ण झाले आहेत. तर युनिटनिहाय ८६ टक्के काम झाले आहे.
हेही वाचा :आता आधार कार्डवरचा फोटो होईल देखणा; 'या' पद्धतीने करा अपडेट
अजून पर्यंत ५लाख ३८ हजार व्यक्ती आजही आधार जोडणीशिवाय लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा कार्डधारकांना आधार लिंक करण्यासाठी १० फेब्रुवारी प्रदेशाची अखेरची मुदत देण्यात आली असून मुदतीत जोडणी न केल्यास १ एप्रिलपासून स्वस्त धान्य मिळणे बंद होणार आहे. रेशनकार्ड फक्त स्वस्त धान्य पुरवणारे साधन नसून रहिवासी पुरावा म्हणूनही या कार्डचा उपयोग होतो.
Published on: 04 February 2021, 05:07 IST