News

अरबी समुद्रात आय अर्थात केंद्रबिंदू असलेलं तौक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीशी समांतर प्रवास करत गुजरातच्या किनारी भागात धडकले. या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या किनारी भागात मोठं नुकसान केलं. किनारपट्टीच्या भागातली वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा या वादळामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला.

Updated on 20 May, 2021 11:02 AM IST

अरबी समुद्रात आय अर्थात केंद्रबिंदू असलेलं तौक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीशी समांतर प्रवास करत गुजरातच्या किनारी भागात धडकले. या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या किनारी भागात मोठं नुकसान केलं. किनारपट्टीच्या भागातली वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा या वादळामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला.

समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जर अधिक तीव्र झाला आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले, तर ते ‘यास’ म्हणून ओळखले जाईल. वातावरणात योग्य ते बदल झाल्यास २६ मेच्या संध्याकाळी हे वादळ किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा!

बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

उद्यापासून सागरी परिस्थिती धोकादायक!

दरम्यान, २१ मेपासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. अंदाजे २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावे दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाला म्यानमारने ‘तौक्ते’ हे नाव दिले होते. चक्रीवादळाला दिलेले हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचे आहे. प्रचंड आवाज करणाऱ्या सरड्याची प्रजाती GECKO वरून हे नाव देण्यात आले आहे. सरड्याला तौत्के म्हटले जाते, ज्याचा उच्चार तौक्ते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला ‘यास’ असं नाव दिले जाईल. ओमेन देशाने हे नाव दिले आहे.

English Summary: Hurricane 'Yass' is now a crisis, warns Indian Meteorological Department
Published on: 20 May 2021, 11:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)