News

सध्या खरीपाची लगबग सुरु झाली आहे, शेतकरी बी बियाण्यांची खरेदी करण्यासाठी तयारी करत आहेत, अशात नांदेडमधील अर्धापूर रोडवरील एका गोदामावर कृषी विभाग आणि पोलिसांनी शनिवारी (२८ मे) संयुक्त छापा टाकला.

Updated on 29 May, 2022 2:01 PM IST

सध्या खरीपाची लगबग सुरु झाली आहे, शेतकरी बी बियाण्यांची खरेदी करण्यासाठी तयारी करत आहेत, अशात नांदेडमधील अर्धापूर रोडवरील एका गोदामावर कृषी विभाग आणि पोलिसांनी शनिवारी (२८ मे) संयुक्त छापा टाकला.

कृषी विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कृषी विभागाने बोगस बियाणे कंपनीचा पर्दाफाश केला. सोयाबीन, उडीद, हरभरा आदी शेकडो क्विंटल बोगस बियाणे मशिनरीसह जप्त करण्यात आले. बोगस बियाणे कंपनी सोयाबीन, उडीद, हरभरा, हरभरा या पिकांचे बोगस बियाणे पॅकिंग करत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कृषी विभागाला दिली.

त्यानंतर कृषी अधिकारी अनिल शिरपुरे आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून बोगस बियाणे साठा उघडकीस आणला. गोदामात सोयाबीन १०० क्विंटल, हरभरा २० क्विंटल, उडीद १०० क्विंटल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन आणि २० कामगार सापडले.

कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाने गोदाम सील केले. मयुरी सीड्स, बुलेट अॅग्री प्रॉडक्ट्स नावाची बोगस बियाणे कंपनी चालवत असल्याचे उघड झाले. या बोगस कंपनीमध्ये बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा फलक, बॅगवरील ठिकाण, लॉट क्रमांक, बॅच क्रमांक अशा अनेक त्रुटी कृषी विभागाच्या निदर्शनास आल्या.

महत्वाच्या बातम्या
Breaking News: मान्सूनचं केरळ मध्ये झालं दणक्यात आगमन; 'या' तारखेला महाराष्ट्रात धडकणार
Small Business Idea: गावातचं सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा लाखों; वाचा

English Summary: Hundreds of quintals of bogus seeds seized; Action of Agriculture Department
Published on: 29 May 2022, 02:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)