निफाड
राज्यात सध्या युरिया खताचा मोठा काळा बाजार सुरू आहे. खरीपाची पेरणी सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खताची गरज भासत आहे. पण कृषी सेवा केंद्राकडून खताचा काळाबाजार सुरु आहे. त्यातच निफाड जवळील लासुर स्टेशन येथिल दोन कृषी सेवा केंद्रावर पोलिसांनी धाड टाकत साडेपाचशे युरिया खताच्या पिशव्या जप्त केल्या आहेत.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, निफाड पोलिसांनी लासूर स्टेशन येथिल दोन कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान वर्धमान कृषी सेवा केंद्र आणि शेलार अॅग्रो या दुकानांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात युरिया खताचा साठा सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने हे खत जप्त केलं आहे.
तसंच या गोडाऊनमध्ये हजारो पिशव्या युरिया खत भिवंडीला देखील पाठवण्यात आले आहे. आणि तेथून ते खत भारताबाहेर गेल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आहे. त्यामुळे या खताच्या काळ्या बाजारामागे आंतरराष्ट्रीय कलेक्शन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरु असून काही ठिकाणी पेरणी झाली आहे. त्यामुळे आता काही पिकांना खतमात्रा देण्याची वेळ आहे. त्यामुळे शेतकरी खतांची मागणी करतात. पण राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक खतांचा काळाबाजार करत असल्याने शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Published on: 05 August 2023, 04:43 IST