Pune News : भारतात अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे कृषी प्रदर्शन बघायला मिळतात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चितच कृषी माहिती शेतकऱ्यांना पोहोचत असते. शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टया असो किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या किंवा आधुनिक शेती कशा पद्धतीने करायची. या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना प्रदर्शनातून मिळत असते.
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे 13 ते 17 डिसेंबर दरम्यान किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा देशात सर्वात मोठा मानला जातो. त्यामुळे याठिकाणी अनेक दिगग्ज कंपनी आपले स्टॉल लावत असते. यामुळे शेतकऱ्यांना याबाबत अधिक माहिती मिळते. सध्या जिथे कृषी प्रदर्शन आहे तेथे अनेक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले आहेत. यावेळी मोठ्या मैदानात हजारो स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच माध्यमातून कृषी जागरणने देखील यात सहभाग घेतला आहे.
किसान मध्ये कृषी जागरण माध्यम समूहाचा सहभाग -
किसान प्रदर्शनात कृषी जागरण देखील सहभागी झाले आहे. टेंड क्रमांक ६ मध्ये ६६४ क्रमांकाचा स्टॉल कृषी जागरणचा आहे. कृषी जागरण हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताच्या माहिती दिली जाते. या प्रदर्शनामध्ये आपल्याला कृषी जागरण ज्या बारा भाषेमध्ये काम करते याचे मासिक पाहायला मिळेल. जे दर महिन्याला कृषी जागरण काढत असते. या मासिकात शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती दिली जाते.
या मेळाव्यासाठी कृषी जागरण माध्यम समूहाची 25 जणांची टीम यात सहभागी झालेली आहे. या किसान मेळाव्याच्या माध्यमातून कृषी जागरणची संपूर्ण टीम तिथे काम करताना दिसत आहे. तिथे आपल्याला कृषी जागरण प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यासोबतच कृषी जागरणचा जो काही ध्यास आहे. अर्थातच मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया (MFOI) आणि रिचेस्ट फार्मर ऑफ इंडिया (RFOI) या सर्व गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम कृषी जागरणची टीम करत आहे.
या मेळाव्यात कृषी जागरणचे संस्थापक एम.सी डॉमिनिक हे देखील आहेत. कृषी जागरणची सर्व टीम आणि डॉमिनिक सर दिवसभर कृषी प्रदर्शनातील वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन त्यांची माहिती घेत आहेत. अनेक कंपन्यांना देखील भेटत आहेत.
यावेळी कृषी जागरण संस्थेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा डॉमिनिक म्हणाले की, मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया २०२३ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सन्मानित करायचं होतं. शेतकऱ्यांना सशक्त करायचं होतं आणि प्रेरित करायचं होतं. भविष्यातही पुढेही मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी जागरण आणि कृषी जागरणची संपूर्ण टीम नेहमी तत्पर असेल आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न कृषी जागरण आपल्या पोर्टल युट्युब आणि मॅक्झिनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यासोबतच कृषी जागरण शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याचा देखील प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टी, कृषी जागृती माहिती घेणार आहे.
कृषी जागरणच्या स्टॉलला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद -
या मेळाव्यात कृषी जागरणचा स्टॉल लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी कृषी जागरणचे प्रकाशित होणारे 12 भाषेतील मासिक शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. तसंच शेतकरी देखील ते मासिक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
Published on: 16 December 2023, 10:59 IST