निसर्गाचा लहरीपणा हा फळपिकांना नडलेला आहे. कोकण विभागातील फळबागा अंतिम टप्यात असताना अवकाळी पाऊसाने आपली हजेरी लावल्यामुळे न भरून काढणारे नुकसान तेथील शेतकऱ्यांना झाले आहे. सतत च्या वातावरणाच्या बदलामुळे आंबा, काजू तसेच रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे सुद्धा नुकसान झाले सुद्धा झाले आहे. कोकणात निसर्गामुळे आतापर्यंत जे नुकसान झाले ते औषधी फवारणी करून भरून निघण्यासारखे होते पण आता जे नुकसान झाले आहे ते न भरून काढण्यासारखे असल्यामुळे हे नुकसान कोणत्या पद्धतीने भरून काढायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कोकणातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही शेतीवर अवलंबून असते.
सततच्या पावसामुळे निम्म्यानेच उत्पादनात घट :-
कोकणातील आंब्याच्या झाडाला मोहर लागला आणि अवकाळीने आपली सुरुवात केली. अवकाळीमुळे पहिल्या हंगामातील झाडांची मोहर गळाला आहे जे की याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. काजू च्या झाडाला जो मोहर आलेला आहे तो यामुळे पूर्णपणे गळून झालेला आहे. दरवर्षी काजू चे पीक १० ते १५ क्विंटल निघते पण यावेळी एक क्विंटल तरी उत्पादन निघतेय की नाही अशी अवस्था यावर्षी झालेली आहे. जशी काजू ची अवस्था झालेली आहे त्याचप्रमाणे आंब्याची सुद्धा अवस्था झालेली आहे. आंब्याच्या नव्या मोहोर ला किडीने घेरले आहे त्यामुळे यंदा आंब्याचे जास्त च नुकसान झाले आहे.
शेतीवरच सर्वकाही अवलंबून :-
कोकणातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती ही तेथील शेतीवर अवलंबून आहे. मात्र हे आर्थिक राजकारण निसर्ग काय सुधारू देत नाही. सतत च्या बदलत्या वातावरणामुळे आणि अगदी पीक हाताला येताना अवकाळी पाऊस आपले आगमन करतो त्यामुळे काजू आंबा ही पिके तसेच रब्बी हंगामातील कडधान्याची पिके आणि मिरची चे पीक सुद्धा संकटात आले आहे. कोकणातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती ही शेतीवर अवलंबून आहे मात्र अशा परिस्थितीत कोरोनाने थैमान घातले तसेच शेतीसाठी काढलेले कर्ज आणि सतत च्या नैसर्गिक संकटांमुळे अशी आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक :-
सतत च्या बदलत्या वातावरणामुळे सर्वात जास्त परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. मात्र यावेळी मोहर लागण्याच्या वेळी अवकाळी पाऊसाने आणि ढगाळ वातावरणामुळे या अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. या सर्व संकटातून शेतकरी आपल्या फळबागा जोपासण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करत आहेत. एका एकरात ज्या पिकाची लागवड करत आहेत त्यास सर्वसाधारण खर्च येतो पण आता दुपटीने खर्च येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे असे मत आहे की झालेला खर्च तरी आपल्या पदरी पडावा असे शेतकऱ्यांचे मत आहे मात्र अंतिम टप्यात सुद्धा अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे जे झालेले नुकसान आहे ते भरून तरी निघत निघतेय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published on: 27 January 2022, 05:13 IST