News

कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भारत सरकार आता एचटीबीटी कॉटन उत्पादीत करण्यासाठी परवानगी देणार असल्याचे सांगितलं जातं आहे. यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे सांगितले जातं आहे. या जातीच्या कापसाच्या उत्पादनाची चाचणी घेण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने नुकतेच स्पष्ट केले आहे. या जातीच्या कापसामुळे कापसाचे उत्पादन वाढत असेल आणि यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर या कापसाच्या उत्पादनास कुठलीच हरकत नसल्याचे सांगितलं जातं आहे.

Updated on 20 February, 2022 5:29 PM IST

विशेष म्हणजे या कापसाच्या उत्पादणासाठी टेक्सटाईल इंडस्ट्री, खाजगी कंपन्या, तसेच संचालक मंडळी सकारात्मक आहेत, यामुळे लवकरच देशात एचटीबीटी कॉटन उत्पादीत केला जाऊ शकतो असे जाणकार लोक सांगत आहेत.

देशातील अनेक पर्यावरण प्रेमी या कापसाच्या उत्पादणामुळे पर्यावरणाचा व जैवविविधतेचा ऱ्हास होईल असा युक्तिवाद करत या कापसाच्या उत्पादनाला विरोध करत आहेत मात्र कापुस उत्पादक शेतकरी कापसासाठी अतिरिक्त मजूर लागते तसेच देशात प्रचंड मजूर टंचाई आहे तसेच कापसामध्ये मोठ्या प्रमाणात तन वाढत असते त्यामुळे कापसाचे मोठे नुकसान होते परिणामी कापसाच्या उत्पादनात घट बघायला मिळते, शिवाय उत्पादन खर्च देखील वाढतो त्यामुळे सरकारने एचटीबीटी कापसाच्या उत्पादनाला मान्यता द्यावी अशी मागणी करत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, पर्यावरण प्रेमी आणि कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा युक्तिवाद लक्षात घेता केंद्र सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय पियुष गोयल जी यांनी मोठी सकारात्मकता दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात बीटी कापसाचा इतिहास जवळपास दोन दशकापूर्वीचा आहे. आज देशातील 110 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 95 टक्के बीटी कापूस लागवड बघायला मिळतो. बीटी 1 आणि बीटी 2 नंतर आता बीटी 3 अर्थात एचटीबीटी तंत्रज्ञान मॉन्सन्टो कंपनीकडे तयार आहे. मॉन्सन्टो कंपनीने bt3 कापसासाठी मध्यंतरी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती मात्र त्यावेळी सरकारने यासाठी हरकत दाखवली होती.

मॉन्सन्टो कंपनी आता प्रमुख औषध निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाणारे बायर कंपनीने खरेदी केली आहे, बायर कंपनीने bt3 कापसासाठी सरकारला आता पुन्हा एकदा प्रस्ताव पाठविला आहे मात्र आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने यासंदर्भात अनुकूलता दर्शविली आहे.

दोन दशकांपूर्वी कापसाचे उत्पादन हेक्‍टरी 179 किलो एवढेच होते मात्र बीटी 1 कापसाची देशात इंट्री झाल्यानंतर कापसाचे हेक्‍टरी 400 किलो उत्पादन झाले. बीटी 2 कापसाची इंटर झाल्यानंतर हे उत्पादन चारशे पन्नास किलो हेक्‍टर एवढे झाले. बीटी 3 कापूस क्षेत्र वाढल्यानंतर यामध्ये दुपटीने वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांद्वारे वर्तविला जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी एचटीबीटी कापसासाठी अनुकूल आहेत.

English Summary: HTBT Cotton will now also be produced in India, favored by the Central Government; Cotton growers will benefit
Published on: 20 February 2022, 05:29 IST