सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे.
यामध्ये सध्या काम करताना मीटर जवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये.
तसेच वओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. विद्युत उपकरणे ओलसर झाली असल्यास ती त्वरित बंद करून प्लगसह बाजूला करावीत. कोणत्याही परिस्थितीत थेट हात लावणे टाळावे.
अखेर पावसाने राज्याला भिजवले, राज्यभर पावसाला सुरुवात..
ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपाला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लास्टिक चप्पल वापरावी. जुनाट व खराब झालेली वायरिंग तत्काळ बदलून घ्यावी.
तसेच विज येत असेल तर कडकडाट होत असेल तर विद्युत उपकरणे बंद करा. तसेच स्वीच बोर्डच्या प्लगपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा दाब वाढून विद्युत उपकरणांचे नुकसान होऊ शकते.
आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा, अखेर सरकारने काढला आदेश..
तोतापूरी जातीच्या बकऱ्याला ८ लाखांची बोली, बकरी ईदमुळे मोठ्या प्रमाणात दर वाढले...
शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, एकरी १० हजार रुपये, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत, केसीआर यांनी राज्यात रणशिंग फुंकले
Published on: 27 June 2023, 03:47 IST