News

साधारणतः मधुमक्षिका पालन म्हणजे नैसर्गिकरित्या मध मिळवण्यासाठी मधमाशा पाळणे यालाच म्हणतात मधुमक्षिकापालन. मधाचे उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मध चवीला अतिशय मधुर असे असून त्याचा उपयोग औषधी म्हणून देखील केला जातो.

Updated on 09 June, 2021 3:39 PM IST

साधारणतः मधुमक्षिका पालन म्हणजे नैसर्गिकरित्या मध मिळवण्यासाठी मधमाशा पाळणे यालाच म्हणतात मधुमक्षिकापालन. मधाचे उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मध चवीला अतिशय मधुर असे असून त्याचा उपयोग औषधी म्हणून देखील केला जातो. आरोग्य चांगले राहण्यासाठी काही लोक मध दुधात मिसळून पितात.

मध पौष्टिक असते की बाळाला जन्म झाल्यानंतर सुद्धा देतात. दैनंदिन जीवनामध्ये मधाचे अनेक फायदे पाहायला मिळतात. या अशा उपयुक्त मधाचे उत्पादन मधुमक्षिकापालन द्वारे कसे करतात या बद्दलची सविस्तर माहिती या लेखात घेऊ.

 मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी

 साधारणतः हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या, मोकळ्या अशा जागेची गरज असते. कारण अशा मोकळ्या जागेत तुम्हाला मधुमक्षिका पालनासाठी लागणारे पेट्या ठेवता येतील. जर तुम्ही दोनशे ते तीनशे पेट्या ठेवणार असाल तर तुम्हाला अंदाजे चार ते पाच हजार स्क्वेअर फूट एवढी जागा लागेल. नंतर मधमाशा यासाठीच या पेट्या खरेदी कराव्या लागतात. विशेष मध्ये या साठी मधमाशा वेगळ्या खरेदी करावे लागत नाहीत. या उद्योगात शेतकरी विदेशी मधमाशा  खरेदी करू शकता. त्या माशांचा मध  बनवण्याचे प्रमाण हे जास्त असतं. या विदेशी माशांमध्ये ए पिस मेली फेरा, ए पीस फ्लोरिया, एपिस इंडिका अशा प्रकारच्या प्रजाती येतात.

या सगळ्या प्रजातींपैकी एपिस मेली फेरा सर्वात जास्त मदत देणारी आणि अंडे देणारी मधमाशी मानली  जाते. ही प्रजात खरेदी करणे ही फायदेशीर असते.. या उद्योगाला सहाय्य म्हणून सरकारकडून आपल्याला दोन ते पाच लाख रुपये कर्ज मिळू शकते. तसेच या व्यवसायात पेट्या सोबतच रिमूवविंग मशीन, चाकू आणि मध गोळा करण्यासाठी ड्रमची गरज असते. तसेच मदन काढणाऱ्या मशीनची देखील गरज असते त्याची किंमत पंचवीस हजार ते 35 हजार असते.

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण कुठे घ्यावे?

 आज  बेरोजगारांना एक सुवर्ण संधी म्हणून नावारूपास आला आहे. जर बेरोजगार लोक हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू इच्छित असतील तर तुम्ही सरकारकडून दिले जाणारे प्रशिक्षणही देऊ शकतात. भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडे जाऊ शकतात किंवा  https://nbb.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन तुम्ही विविध माहिती जाणून घेऊ शकता. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतात.

 मधुमक्षिका पालन केव्हा आणि कुठे करावी?

 हा व्यवसाय करण्यासाठी सर्वात उत्तम कालावधी म्हणजे जानेवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा असतो. ज्या ठिकाणी मधुमक्षिका पालन करायचे आहे ती जागा अतिशय  स्वच्छ व नीटनेटके असायला हवी. फुल शेती असलेल्या ठिकाणी जर मधुमक्षिका पालन व्यवसाय केला तर तो फारच फायदेशीर ठरतो. कारण आपल्याला माहीतच आहे की मधमाशा जितके फुलांमधून रस शोषण तील  तेवढे उत्तम दर्जाचे मध तयार करतात.

 

मध कसे गोळा करावे?

 यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधमाशा ज्या  ठिकाणी मध  गोळा करतात ते पोळे मधाने पूर्ण भरलेले आहेत किंवा  नाही. जर पोळ्यांमध्ये व्यवस्थित मध जमा झाले असेल तर ते काढताना दक्षता घ्यावी. याठिकाणी पदार्थ जमा झाले असतील ते चाकून वेगळे करावेत. जो माल आपण वेगळा  करतो त्याला यंत्र जमा करावा. यानंतर यंत्र सुरू कराल तेव्हा त्या पदार्थांमधून मध वेगळे होऊन आपोआप बाहेर पडेल. काढलेले मध चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे. मागणीनुसार तुम्ही मद साठवून ठेवू शकता.

 मधुमक्षिका पालन करून किती नफा कमवू शकता?

 साधारणतः ज्या व्यवसायामध्ये लागणाऱ्या मधुमक्षिका पेटी ची किंमत सुमारे 3500 रुपये असते. साधारण दहा एका पेटीत दहा फ्रेम्स असतात. एका फ्रेम मध्ये 250 ते 300 मधमाशा राहतात. जवळजवळ एका फ्रेम मधून 200 ग्रॅम मध काढले जाते. म्हणजे एका पेटीतून आपण दोन किलो मध काढू शकत. प्रेम्स रिकाम्या झाल्या की दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत मधमाशा पेटीतील प्रेम्स मधाने  भरून टाकतात. तुझ्यासोबत एका महिन्यातून आपण एका पेटीतून चार किलो मध प्राप्त करू शकतो. सात लाख रुपयांच्या पेट्या विकत आणल्यावर एका महिन्यात आपण बाराशे किलो मधाचे  उत्पादन करू शकता.

मार्केटमध्ये याचा दर 80 रुपये ते शंभर रुपये किलो हिशोबाने विकू शकता.  कशा पद्धतीने आपण एका महिन्याल एक लाख 15 हजार रुपये किमतीचे मध घेऊ शकता. त्यासोबतच मदा पासून मिळणारे मेण विकू शकता. सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा हा एक महिन्याला 70 हजार 80 हजार रुपये मिळू शकता.

 पावसाळ्यात मधमाशांची कशी काळजी घ्यावी?

 पावसाळ्यामध्ये मधुमक्षिका पालन करण्यासाठी अशी जागा निवडावी की जिथे पाणी जमा होणार नाही. साखरेचे पाणी उकळून त्यामध्ये बी काम्प्लेक्स कैप्सूल आदी औषधे मिसळून ठेवून दिल्यास मधमाशांचे रोगप्रतिकारशक्ती वाढते पावसाळ्यात अधुन- मधून स्वच्छ ऊन असते तेव्हा पेटीएम मधून फ्रेम्स बाहेर काढाव्या योग्य साफ केल्यावर त्यांन ऊन दाखवावे..

 

घ्यावयाची काळजी

  • मध गोळा करण्यासाठी आपल्याला मधमाशीची जी प्रजाती सांगितले आहे तीच विकत घ्यावी
  • मधमाशांच्या पेट्या  स्वच्छ जागेत ठेवावे कीटकांमुळे त्यांना नुकसान होऊ शकते.
  • पाल सारखे भिंतीवर सरपटणारे प्राणी मधमाशा खाऊन टाकतात. त्यामुळे तुम्हाला अशी जागा विकसित करायची आहे की जिथे अशा नुकसानकारक प्राण्यांचा उपद्रव होणार नाही.
  • मधमाशा विषारी असतात त्यांनी आपल्याला दंश केल्यास आपल्याला उपचार घ्यावे लागतात.
  • कित्येक  वेळी मधमाशा चावल्याने लोकांचा मृत्यू होतो.
  • मधुमक्षिका पालन व्यवसाय खूप स्वच्छता ठेवावी लागते. त्यामुळे खर्च पेलणे शक्‍य नसेल तर सुरुवातीला कमी पेट्या  विकत घेऊन व्यवसाय सुरू करा..
  • मदत गोळा करण्यापूर्वी मधमाशा पोळ्यात आहेत की नाही  हे बघावे. मधमाशा अंड्यामध्ये नसतील तेव्हाच मध काढावे.
English Summary: How to start a high yielding bee keeping business?
Published on: 09 June 2021, 06:55 IST