News

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे बहूसंख्य लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करतात तसेच शेती आणि पशुपालन हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. शेतकरी वर्गावर नेहमी संकटाची मालिका सुरूच असते कधी रोगराई तर कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग सतत चिंतेत असतो.

Updated on 26 September, 2022 1:04 PM IST

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे बहूसंख्य लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करतात तसेच शेती आणि पशुपालन हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. शेतकरी वर्गावर नेहमी संकटाची मालिका सुरूच असते कधी रोगराई तर कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग सतत चिंतेत असतो.

सततच्या हवामानातील बदल आणि वातावरण यामुळे त्याचा परिणाम हा शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात होत असतो. पिकांवर रोगराई तर कुठ कीड पडणे यासारखे प्रकार घडतात. सध्या गेल्या काही दिवसांपासून पिकांवर घोणस ही अळी दिसून आली आहे ही अळी पिकांवर तसेच शेतकरी वर्गासाठी सुद्धा खतरनाक आहे.

या पिकांवर घोणस अळीचा प्रादुर्भाव:-
प्रामुख्याने ही अळी तीगवत, एरंडी, मका, आंब्याच्या झाडावर आढळून येते, तर तृणवर्गीय पिके व काही फळपिकावर सुद्धा कमी प्रमाणात आढळून येते. ही अळी पिकांची पाने खात असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट होते.

हेही वाचा:-जाणून घ्या, बडीशेप खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, वाचून विश्वास

 

 

 

अळीवर नियंत्रण कसे ठेवाल?

या अळीच्या व्यवस्थापनासाठी विशिष्ट कीटकनाशकांची शिफारस नसली तरी क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी) किंवा प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी) किंवा क्विनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी) किंवा इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी) यापैकी एक कीटकनाशक व पाच टक्के निमार्कची फवारणी करावी.

हेही वाचा:-यूट्यूब वर शिकून केली ड्रॅगन फळ लागवड, पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याने घेतले लाखाचे उत्पादन

 

या अळी ने दंश केल्यास काय करावे:-
जर गवत काढताना किंवा रानात फिरताना या अळी ने दंश केल्यास त्या ठिकाणी चिकट टेप चिकटवून ताे हलक्या हाताने काढावा. त्या ठिकाणी बर्फ तसेच बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावावी. लक्षणे तीव्र असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. अळीच्या व्यवस्थापनासाठी गवतावर कीटकनाशकाची फवारणी केल्यास ते गवत फवारणीनंतर किमान सात दिवस गुरांना खाऊ घालू नये.

English Summary: How to protect yourself and the crop from the dangerous cutworm, read in detail
Published on: 26 September 2022, 01:04 IST