News

निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. शेतात कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Updated on 07 June, 2023 9:51 AM IST

निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. शेतात कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

सध्या पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन पाच टक्के निंबोळी अर्क घरच्याघरी तयार करता येतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत.

निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात.

उसावरील मर रोगाचे नियंत्रण, जाणून घ्या...

भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळीअर्क फवारला जातो. रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळअर्काचा उपयोग होतो.

मोठी बातमी! बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात पेटवून घेतले...

निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या उपाशीपोटी मरून जातात. 

मान्सूनची चिंता वाढली! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं आगमन होणार..
आता जनावरांना लागणार कॉलर, गतिशीलता आणि आजाराची मिळणार माहिती...
कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना बजावली नोटीस, सरकार आक्रमक...

English Summary: How to prepare nimboli extract? Nimboli is currently on the verge of ripening..
Published on: 07 June 2023, 09:51 IST