News

अनेक शेतकरी हे आडसाली उसाची पीक पद्धत जाणून घेऊन त्यानुसार खते देतात. आडसाली हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा १६ ते १८ महिन्यांचा असतो. एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत तीन वर्षे राहते. यासाठी सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्‍यक असते.

Updated on 21 September, 2023 11:24 AM IST

ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेऊ शकतो. पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वापसा आल्यावर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतर पीक लावून बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे.

१० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत द्यावा.

नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्‍यक आहे. लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत. उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. 

दरम्यान, लागणीनंतर ४ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही. लागवडीची खत मात्रा शेणखतात मिसळून द्यावी. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपयुक्तता वाढून ती पिकास लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.

खत मात्रा ठिबक संचाद्वारे दिल्यास खतांची उपयुक्तता वाढते आणि खर्चात बचत होते. रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांच्या साहाय्याने द्यावीत. उभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वापसा असावा.    

शेतकऱ्यांनो काजू शेती आहे फायदेशीर, जाणून महत्त्वाच्या गोष्टी..

English Summary: How to manage sugarcane? What fertilizers should be given to sugarcane? Find out...
Published on: 21 September 2023, 11:24 IST