जर आपल्याकडे शेत जमीन असेल तर तुमच्या कानावर खातेफोट, वारस हक्क, सातबारा, वारस नोंदी अशी शब्द नक्कीच आले असतील. आप आज या लेखात खातेफोड कशी करायची याची माहिती घेणार आहोत. खाते फोड करताना काय अडचणी येत असतात, कोणत्या कायदयाने केली जाते याची माहिती आपण आज घेऊ.
जमीन महसूल अधिनियमानुसार तहसीलदारांना महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जो प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रिकरण अधिनियम १९४७ च्या कायद्यात बांधील राहून शेत जमिनीचे वाटप करण्याचा अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९९६ नुसार कायद्याने देण्यात आला आहे.मात्र त्यासाठी संबंधित सहधारकांनी विनंती अर्ज करणे, सदर जमिनीवर कोणाचा हक्क, अधिकार आहे का हे पडताळून पाहण्यात प्रसिद्ध देऊन हरकती मागवून व संमती घेऊन जमिनीचे वाटप केले जाते. आणि संमतीविना जमिनीचे वाटप करण्याचा आदेश देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे.
सार्वजनिक हिस्सेभागीत जमिनीचे खाते-फोड करणे तेवढे सोपे नाही. जेवढे हिस्सेदार आहेत त्यांना प्रथम एकत्रित करुन उद्देश समजावून सर्वांना पटेल असे खाते वाटप करावे. त्यासाठी कोणीतरी हिस्सेदारी मेहनत घेणे भाग आहे. संबंधित जमिनीच्या वाटपासाठी शेतकऱ्यांनी सर्व हिस्सेदारांच्या संमतीचा विनंती अर्ज तहसीलदारांकडे करावा. कोर्ट फी स्टॅम्प लावावा व त्यासोबत गावच्या तलाठ्याकडून चालू सात बारा उतारा आणि त्यावर नोंद असणाऱ्या सर्व जमिनीचे सातबारा उताराची प्रत जोडावी. कुटुंब मोठे असल्याने जमिनीचे वाटप कशाप्रकारे करणार याची सविस्तर माहिती अर्जात लिहावी. जमिनी वाटपाबाबत हरकत नसल्याचा सर्व हिस्सेदार यांच्या अर्जावर सह्या घेणे आवश्यक आहे. खातेदारांच्या पत्नीचीही अर्जावर सही घेणे आवश्यक आहे. अज्ञात व्यक्तीच्या बाबतीत पालन करते तिची संमती घ्यावी. जमीन वाटपात बहिणींना हिस्सा घ्यावा लागतो. तो जर त्यांना नको असेल तर मात्र त्यांचे हक्क सोडण्यास तहसीलदारांकडे जबाब देऊन सह्या कराव्या लागतात.
सातबारा उताऱ्यावरील बहिणींची नावे हक्क सोडण्याची प्रत मिळाल्यावर हक्कातील नोंदी कमी करतो. त्यानुसार फेरफार नोंद तलाठी करतो. अर्थातच बहिणींची नावे कमी केली जातात. सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा असेल तर ज्या संस्थेचे कर्ज असेल त्यांचे वाटपास हरकत नसल्याचे संमती पत्र द्यावी लागते. अशा प्रकारे हक्कातील नोंद कमी करुन नंतर वाटपासाठीचा अर्ज विचारात घेतला जातो. विनंती अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून तहसीलदार कार्यलयात अर्ज सादर करावा. एक महिन्यात त्यांना लेखी सूचना पत्र मिळेल. त्याची एक प्रत संबंधित तलाठीला देण्यात येते संबंधी तहसीलदारांना ठरल्याप्रमाणे तहसीलदार कार्यालयात जबाब देण्यासाठी जावे लागते, याची जाहीर घोषणा केली जाते. नंतर तहसीलदार वाटपाचा अंतिम आदेश देतात, त्याची नोंद तलाठी करतात.
फेरफार बुकमध्ये सर्व हिस्सेदार यांच्या सह्या घेतल्या जातात. फेरफार मंजुरीनंतर तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे स्वतंत्र सातबारा उत्रे सह् हिस्सेदाराला मिळू शकतात. मात्र जर कोणी आक्षेप घेतल्यास त्याची सुनावणी तहसीलदारांकडे होतो आणि त्यांचा निर्णय बंधनकारक असतो.तर अशाप्रकारे आपण आपले खातेवाटप करुन घेऊ शकतो.
Published on: 21 March 2021, 01:59 IST