News

या पीकाला जास्त दिल्या गेल्यास वेली पिवळ्या पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर फळे लागण्याच्या काळात पाणीचे प्रमाण कमी पडल्यास फळांना योग्य आकार येत नाही व फळे वेडीवाकडी येतात.

Updated on 25 September, 2023 5:47 PM IST

Karela Crop Management :

कारले हे वेलवर्गीय पीक असून आरोग्यासाठी हे खुप महत्वाचे मानले जाते. हे पीक साधारण चार महिन्यांचे आहे. बाजारपेठांमध्ये पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या कारल्यांना भरपूर मागणी असते. कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे असते. कारण जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही व फळांचा जमिनीशी संपर्क आल्याने फळे सडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार दिल्या जातो.

या पीकाला जास्त पाणी दिल्या गेल्यास वेली पिवळ्या पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर फळे लागण्याच्या काळात पाणीचे प्रमाण कमी पडल्यास फळांना योग्य आकार येत नाही व फळे वेडीवाकडी येतात. खरीप हंगामात या पीकाला ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे, तसेच उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी देणे उत्तम असते.

कारले पीकावर पडणारे रोग -
केवडा:-उष्ण व दमट हवामानात हा रोग जास्त पसरतो. या रोगामध्ये पानाच्या खालच्या भागावर पिवळे डाग पडतात कालांतरानेत हे डाग वाढत जाऊन काळसर होवुन पान गळून जाते.
भुरी: या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.भुरी रोग अगोदर जुन्या पानावर येतो. हा रोग बुरशीजन्य असुन पानाच्या खालच्या बाजूने सूरु होवुन नंतर पानाच्या पृष्ठभागावर सुद्धा पसरते.आणि या रोगाचे प्रमाण वाढले की पाने पिवळी होऊन गळून पडतात.

कारले पीकावर पडणारी किड-
फळमाशी: फळमाशी ही कीड उन्हाळी हंगामात आढळते. या किडीचे पतंग मादी कळीच्या त्वचेमध्ये अंडी घालतात. या अंड्यांमधु ज्या अळ्या बाहेर येतात फळांमध्ये वाढतात आणि पूर्ण वाढल्या की फळाला भोक पाडतात. फळमाशी लागलेली फळे वेडीवाकडी होतात व बरीचशी फळे त्याचजागी पिकलेली दिसतात.फळ माशी हे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात अशी बाधित फळे वेळोवेळी काढून नष्ट केल्यास दुसरी फळे खराब होत नाहीत.
तांबडे भुंगेरे: पीक रोपवस्थेत असताना ही कीड पीकावर पडते. हे नारंगी तांबड्या रंगाचे कीटक अंकुर आल्यावर त्यावर उपजिविका करतात.
मावा: मावा कीड पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच विष्णूजन्य रोगांचा प्रसार करतात.
पांढरी माशी -माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते.
अंकुर आणि मुळे खाणारी अळी - अळी पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते.

पान पायांचा ढेकूण-
काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते.अंकुर वळतात व फळांवर गर्द काळा ठिपका पडुन फळे गळायला लागतात.न वरील रोग टाळण्यासाठी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करावी. पिकांची फेरपालट करावी व पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरची पिके पूर्णपणे नष्ट करावे. त्याचबरोबर पिकांमध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पीके भुरी रोगाला बळी पडतात, त्यामुळे पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवल्यास पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.
भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी बॅसिलस सबस्टीलीस ३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पिकात फवारणी करावी.
शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खालील रासायनिक घटकांचा वापर करावा. रोको - १० ग्रॅम, कोंटाफ प्लस - ३० मिली,अवतार - ३० ग्रॅम.या पैकी एक बुरशीनाशक घेऊन १० ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा आलटून पालटून फवारणी करावी. वरील पद्धतीने नियोजन केल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.

English Summary: How to do proper management and pest control of karela crop
Published on: 25 September 2023, 05:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)