आज एक जानेवारी 2022, नवीन वर्षाच्या पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी (Prime Minister Hon'ble Shri Narendraji Modi) यांनी आपल्या करकमला द्वारे पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. देशातील जवळपास अकरा कोटी शेतकरी या दहाव्या हफ्त्याची अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. जरी पीएम किसानचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला गेला असला तरी अनेक पात्र शेतकऱ्यांच्या मनात याबाबत संभ्रमता बनलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता, जेव्हा शासनाला याविषयी समजले तेव्हा शासनाने अशा शेतकऱ्यांकडून योजनेचे पैसे परत मागविले होते, तसेच अशा पात्र शेतकऱ्यांची नावे या योजनेतून कायमचे वगळण्यात आले आहेत.
या अपात्र शेतकऱ्यांमध्ये अनेक शेतकरी हे करदाते निघाले होते त्यामुळे त्यांची नावे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी (Ambitious) योजनेतून कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आपले नाव यादीत आहे की नाही याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. मात्र आता चिंता करण्याचे काही कारण नाही, कारण की दहाव्या त्याची रक्कम आपल्या खात्यावर पडली आहे की नाही याची माहिती आता शेतकऱ्यांना केवळ एका क्लिकवर मिळणार आहे. आज आपण पीएम किसान सम्मान निधिच्या दहावा हप्ता प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी कशी बघायची याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया पी एम किसान चा दहाव्या हफ्त्याची यादी कशी बघायची याविषयी.
कसे बघणार यादीत आपले नाव (How to see your name in the list)
शेतकरी मित्रांनो जर आपणासही पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता (10th Installment) खात्यात जमा झाला आहे की नाही हे जाणुन घ्यायचे असेल तर आपणांस फक्त आपले आधार कार्ड जवळ ठेवावे लागणार आहे. यादीत आपले नाव चेक करण्यासाठी योजनेला पात्र असलेल्या शेतकर्यांना सर्वात आधी पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला (Official Website) भेट द्यावी लागेल. वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्या समोर वेबसाइटचे होम पेज (Home Page) ओपन होईल या होम पेज वरती आपणास फार्मर्स कॉर्नर असा पर्याय दिसेलया पर्यायावरती आपणास जावे लागेल.
फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेज वरती आपणांस
»New Farmer Registration
»Edit Aadhar Failure Record
»Beneficiary Status
»Beneficiary List
»Status of Self Registered/CSC Farmer
»Download PM-Kisan Mobile App
असे पर्याय दिसतील. या पर्यायांपैकी आपणास Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक करताच क्षणी आपल्या समोर अजून एक पेज ओपन होईल, या पेज वरती आपणास आपले राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपले महसूल मंडळ, आपले गाव या सर्व गोष्टी नमूद कराव्या लागणार आहेत. नंतर गेट रिपोर्ट (Get Report) या बटन वर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर आपल्यासमोर एक यादी ओपन होईल, या यादीत आपणास आपले नाव शोधावे लागणार आहे. जर यादीत आपले नाव असेल तर आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल आणि योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा केली गेली असेल.
Published on: 01 January 2022, 07:55 IST