शेतीत दुप्पट नफा कोणाला नको. त्यासाठी गरजेचे असते बियाणे. बियाणे खरेदी करतांना बियाण्यांची निवड कशी असावी असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? नं १ बियाणे खरेदी करतांना स्थानिक वातावरणास योग्य असलेले बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी करतांना शक्यतो शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठे किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्र यांच्याकडे बियाणे उपलब्ध असतील तेथुनच बियाणे खरेदी करावेत. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यांच्या अनुभवाची माहीती घेऊनच निवड करावी. सुधारित वाणाची माहीती घेऊन बियाणे खरेदी करावी. चांगल्या प्रतिचे आणि प्रमाणित बियाणे खरेदी करावेत.
बियाण्याचे प्रकार कसे ओळखायचे?
बियाण्याचे प्रकार असतात आणि ते कसे ओळखायचे हे तुम्हाला माहीती आहे का? बियाण्याचे चार प्रकार पडतात. मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे तसेच सत्यप्रत बियाणे असे चार प्रकार आहेत. आता हे बियाणे ओळखण्याची देखील एक पद्धत आहे. शेतकरी खूणचिठ्ठीच्या रंगावरुन बियाण्याचे प्रकार ओळखु शकतात. खूणचिठ्ठीत विशिष्ट असे रंग असतात. मूलभूत बियाण्याच्या खूणचिठ्ठीचा रंग पिवळा असतो. तर पायाभूत बियाण्याच्या खूणचिठ्ठीचा रंग पांढरा असतो.
प्रमाणित बियाण्याच्या खूणचिठ्ठीचा रंग निळा असतो. तर सत्यप्रत बियाण्याच्या खूणचिठ्ठीचा रंग फिक्कट हिरवा असतो. याप्रमाणे शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे बियाणे खरेदी करावयाचे आहे याची खात्री खूणचिठ्ठीच्या रंगावरून करता येते. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना शेतकरी प्रमाणित बियाण्याचे बीजोत्पादन करीत असतील तर त्यांना पेरणीसाठी त्या पिकाच्या वाणाचे पायाभूत बियाणे वापरावे लागते. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आवश्यक असणारे बियाणे खरेदी करावे.
Published on: 05 June 2024, 04:11 IST