News

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे डबघाईला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कलिंगड उत्पादक शेतकरी देखील गेली दोन वर्षे कोरोना मुळे मेटाकुटीला आला आहे.

Updated on 29 April, 2022 10:44 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे डबघाईला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कलिंगड उत्पादक शेतकरी देखील गेली दोन वर्षे कोरोना मुळे मेटाकुटीला आला आहे.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना कलिंगड विक्रीसाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले होते. कोरोनाचे निर्बंध संपूर्ण देशात लावले असल्याने त्यावेळी कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेला कलिंगड विक्री करता आला नाही यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फटका बसला होता.

हेही वाचा :

Success : डाळिंब शेतीत लाखो रुपयांचे उत्पन्न कमवल्यानंतर आता 'हा' अवलिया शेवगा शेतीतून कमवत आहे लाखों

शेतकऱ्याची यशोगाथा! या टेक्निकचा वापर करून अवघ्या दोन एकर संत्रा बागेतून मिळवले तब्बल दहा लाखांचे उत्पन्न

यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे पदरी पडतील अशी आशा होती. मात्र, जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी काचळेमळा येथील कलिंगड उत्पादक शेतकरी किशोर दत्तात्रय काकडे यांच्या दीड एकर क्षेत्रावर लावलेली कलिंगड फळबाग गुरुवारी मध्यरात्री अज्ञात इसमाकडून उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या अज्ञात इसमाने मध्यरात्रीस शेतात तयार झालेल्या कलिंगड पिकावर धारदार हत्याराने हल्ले करत सर्व कलिंगड पीक इतरत्र फेकुन दिले. या अज्ञात इसमाच्या खोडसाळपणामुळे किशोर यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.

याबाबत माहिती देताना कलिंगड उत्पादक शेतकरी किशोर यांनी सांगितले की, त्यांनी कलिंगडचे पीक तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासले होते. महागड्या औषधांची फवारणी करत अहोरात्र काबाडकष्ट करून किशोर यांनी कलिंगडाचे पिक जोपासले होते.

किशोर टरबुज पिकाचे राखण करण्यासाठी रोजच रात्री एक वाजेपर्यंत पाळद ठेवत असत. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशीदेखील किशोर यांनी रात्री एक वाजेपर्यंत पाळत ठेवले होते. मात्र रात्री एक वाजेनंतर जेव्हा किशोर आणि त्यांचे कुटुंबीय घरी गेले त्यावेळी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने टरबूज पिकाचे नुकसान केले.

किशोर यांच्या मते यामुळे त्यांचे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात काकडे यांनी पिंपळवडी पोलिसात फिर्याद देखील दाखल केली आहे. निश्चितच काकडे कुटुंबियांच्या हातातोंडाशी आलेला घास या अज्ञात इसमाने हिरावून नेला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये त्या इसमाचा देखील कुठलाचं फायदा झालेला नाही. त्यामुळे हा खोडसाळपणा का केला असेल असा प्रश्न काकडे कुटुंबियांना पडला आहे.

English Summary: How ridiculous! An unidentified man killed a watermelon crop
Published on: 29 April 2022, 10:44 IST