News

राज्यातील २१ जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे. तर आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मात्र, सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे.

Updated on 01 September, 2023 5:26 PM IST

राज्य

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. आत्तापर्यंत राज्यात सुमारे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आतापर्यंत कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात १२३ टक्के, विदर्भात १०८ टक्के, मराठवाड्यात ९६ टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

राज्यातील २१ जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे. तर आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

अजित पवारांकडून मदतीची घोषणा

राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १० हजार रुपयांची आर्थिक मदत अजित पवार यांनी जाहीर केली आहे.

English Summary: How much rain in the state What did the weather department say
Published on: 25 July 2023, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)