महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र सरकारने २०२०-२०२१ मध्ये वेगवेगळ्या १२ योजनांमार्फत १,१४९.१० कोटी रुपयांचे वाटप केले आहे जे की ज्यावेळी लोकसभेमध्ये प्रश्न चालू होते त्यावेळी शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून मोदी सरकारने जे प्रयत्न केले त्याची माहिती मागितली.
मोदी सरकारने दिले महाराष्ट्र राज्याच्या ११४९ कोटी रुपये:
शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी जो प्रश्न केला त्या प्रश्नाला कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी चोख उत्तर दिले जसे की मोदी सरकारने महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (एनएफएसएम) साठी १५३.३६ कोटी रुपये दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी आहे त्या योजनेसाठी मोदी सरकारने ४०० कोटी रुपये दिले. ओएस अँड ओपी या योजनेसाठी मोदी सरकारने ३९.३८ कोटी रुपये दिले. कृषी यांत्रिकीकरण उप - अभियानासाठी मोदी सरकारने ७७.९२ कोटी रुपये दिले तसेच मृदा आरोग्य कार्ड योजना साठी ०.४६ कोटी रुपये दिले.
हेही वाचा:Amul Franchisee Registraion : अमूलसोबत अशाप्रकारे सुरू करा व्यवसाय, होईल एवढी कमाई
राष्ट्रीय कृषी विकास योजना साठी २९०.८८ कोटी रुपये दिले. कोटी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण एजन्सी म्हणजेच आत्मा या योजनेसाठी १७.४१ कोटी रुपये दिले. आरएडी योजना साठी १९ कोटी रुपये तर एकात्मिक फळबाग विकास मिशनसाठी १३० कोटी रुपये देण्यात आले. शेती वनीकरण साठी २ कोटी तर परंपरागत कृषी विकास योजना साठी मोदी सरकारने महाराष्ट्र राज्याच्या १३ कोटी रुपये दिले.मोदी सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून जे प्रयत्न केले आणि त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा जाहीर करून दाखवल्याने महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकारवर भाजपचे नेते उदय प्रताप सिंह फटकारले.
उदय प्रतापसिंह लोकसभेच्या चर्च दरम्यान म्हणाले की केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याच्या सर्व मदत करत आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे सरकारच तेथील शेतकऱ्यांना कोणतीही मदत करत नाही असे आरोप उदय प्रताप सिंह यांनी टाकले.5 वर्षांत महाराष्ट्राला किती पैसे दिले,मोदी सरकारने पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून १२ योजनांच्या माध्यमातून ६३५३.९७ कोटी रुपये निधी दिला.तसेच पंतप्रधान किसान सन्मान योजना चा नऊवा हप्ता लवकरच जमा होणार असल्याचे सांगितले आहे. मोदी सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांमध्ये सर्वात यशस्वी योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना आहे असे सांगितले जात आहे.प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यामध्ये वर्षाला ६ हजार रुपये येतात जे की प्रति ४ महिने २ हजार रुपये जमा होतात यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत होते.
Published on: 25 July 2021, 06:50 IST