News

मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडेही वळत आहेत. देशातील मोठ्या संख्येने लोक इलेक्ट्रिक कारची खरेदी करत आहेत. त्याचबरोबर सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहे आणि इलेक्ट्रिक स्टेशन बांधत आहे.

Updated on 01 September, 2021 12:13 AM IST

मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडेही वळत आहेत. देशातील मोठ्या संख्येने लोक इलेक्ट्रिक कारची खरेदी करत आहेत. त्याचबरोबर सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहे आणि इलेक्ट्रिक स्टेशन बांधत आहे.

अशा परिस्थितीत, बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की इलेक्ट्रिक कार पूर्णपणे चार्ज करण्यासाठी किती वेळ आणि पैसा लागतो, इलेक्ट्रिक चार्जिंगचा दर काय आहे? आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत.

चार्जिंग दर काय आहे?

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग दराबद्दल बोलायचे तर मुंबईच्या तुलनेत दिल्लीतील दर कमी आहेत. मुंबईत गाडी चार्ज करण्यासाठी 15 रुपये प्रति युनिट आकारले जात आहेत. तर दिल्लीमध्ये लॉन टेन्शन वाहनांसाठी 4.5 रुपये प्रति युनिट आणि हाय टेन्शन वाहनांसाठी 5 रुपये प्रति युनिट आकारले जाते. संपूर्ण वाहन चार्ज करण्यासाठी 20 ते 30 युनिट लागतात. अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये 120 ते 150 रुपयांमध्ये वाहन पूर्णपणे चार्ज करता येते. त्याचबरोबर मुंबईत त्याची किंमत 200 ते 400 रुपये आहे.

गाडी चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो?


इलेक्ट्रिक वाहन दोन प्रकारे चार्ज केले जाऊ शकते. यात फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे बॅटरी 60 ते 110 मिनिटांत चार्ज होऊ शकते. तर स्लो चार्जिंग किंवा पर्यायी चार्जिंगला 6 ते 7 तास लागतात.

 

एकदा चार्ज केल्यावर गाडी किती लांब जाते?


सिंगल चार्जवर कार किती अंतरावर चालेल हे त्याच्या इंजिनवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, 15 KMH बॅटरीसह, कार 100 किलोमीटर धावू शकते. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीनुसार, किती अंतर कापले जाऊ शकते याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तर काही टेस्ला कार एकदा चार्ज केल्यावर 500 किमी पर्यंत धावतात.

English Summary: How much does it cost to fully charge an electric car How many kilometers does a charge run
Published on: 01 September 2021, 12:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)