सध्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजले. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 14234 इतक्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या चौथी जिल्ह्यामधल्या या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबरला जाहीर केला आहे. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान 18 जानेवारीला मत मोजणी होणार आहे. परंतु एखाद्या गावाचा बजेट कसं ठरतं प्रत्यक्षात गावाच्या विकास कामांसाठी निधी मिळतो का? व मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत किती व कोठे खर्च करते हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
गावाचं बजेट कसे ठरत?
वर्षाच्या प्रत्येक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ग्राम विकास समितीची बैठक बोलावली जाते. यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण इत्यादी गरजांचा विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती उपलब्ध आहे आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे यासंबंधीचा एक अंदाज पत्रक तयार केले जाते. हे अंदाजपत्रक 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवणे आवश्यक असतं. पंचायत समिती पुढे हे अंदाजपत्रक सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते. एका गावासाठी एकंदरीत अकरा शेचाळीस योजना असतात. संबंधित योजना राज्य सरकारच्या असेल तर शंभर टक्के निधी राज्य सरकार देतात आणि केंद्राचे बहुतांश योजनांसाठी 60 टक्के केंद्र सरकारचा 40 टक्के राज्य सरकार देते. एक एप्रिल दोन हजार वीस पासून सुरू झालेल्या 15 व्या वित्त आयोग अनुसार सरकार प्रतिमाणशी प्रतिवर्षी 957 रुपये देत आहे.
हेही वाचा :कृषी उत्पन्न बाजार समिती का तयार केल्या गेल्या? काय आहेत त्याचे फायदे
आपल्या गावच्या ग्रामपंचायत किती पैसा खर्च केला?
हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून ई ग्रामस्वराज्य नावाची आपलिकेशन डाऊनलोड करायचा आहे. हे आपलिकेशन ओपन केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते. त्यात तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेट मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायत मधे तालुका आणि व्हिलेज पंचायत मध्ये ना गावाचं नाव निवडायचं आहे. एकदा ही माहिती पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला सब्मिट बटनावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेज वर सगळ्यात वरती आपण जी माहिती भरलेली असते तुम्हाला दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांक हे दिसेल. त्याखाली तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठी ची माहिती पाहिजे आहे ते वर्ष निवडायचे त्यानंतर तुमच्या समोर तीन वेगळे पर्याय येतात.
यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ईआर डिटेल्स यामध्ये ई आर म्हणजेच एलेक्टेड रेप्रेसेंतातिवे म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केले की तुम्हाला गावातील सरपंच, सचिव ग्रामपंचायत सदस्यांच्या सविस्तर माहिती यात दिसून येते. यात संबंधित यांचे नाव, पत्ता, वय, जन्मतारीख अशी माहिती दिलेली असते. यामध्ये दुसरा पर्याय म्हणजे अप्रू ऍक्टिव्हिटीज हा आहे. यात ग्रामपंचायत कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे सांगितले असते. त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे फायनान्स एल प्रोग्रेस. या पर्यायांमध्ये गावाच्या आर्थिक प्रगती विषयी माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
त्यात आपण ज्या आर्थिक वर्ष निवडलेली असते ते सुरुवातीला तिथे दिलेले असतं त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेले असतात. त्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम रिसिप्ट या पर्याय समोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे रक्कम एक्सपेंडिचर या पर्याय समोर दिलेली असते. त्याखाली लिस्ट ऑफ स्किंस हा पर्याय असतो. त्यामध्ये ग्रामपंचायतीला जो एकूण निधी मिळाला त्याची विभागणी केलेली असते. त्यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.
Published on: 24 December 2020, 12:54 IST