News

सोयाबीन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक प्रमुख पीक असून गेल्या हंगामामध्ये बाजार भावाच्या बाबतीत सोयाबीनने शेतकऱ्यांची पूर्णतः निराशा केली. सोयाबीन बाजारभावावर देशांतर्गत परिस्थितीचा जसा परिणाम होत असतो तसाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयाबीनचे उत्पादन यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम हा भारतातील बाजारपेठेवर होत असतो. गेल्या दोन वर्षापूर्वीचा विचार केला तर सोयाबीनला कधी नव्हे एवढे विक्रमी दर मिळाला होता.

Updated on 30 August, 2023 9:03 PM IST

सोयाबीन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक प्रमुख पीक असून गेल्या हंगामामध्ये बाजार भावाच्या बाबतीत सोयाबीनने शेतकऱ्यांची पूर्णतः निराशा केली. सोयाबीन बाजारभावावर देशांतर्गत परिस्थितीचा जसा परिणाम होत असतो तसाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयाबीनचे उत्पादन यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम हा भारतातील बाजारपेठेवर होत असतो. गेल्या दोन वर्षापूर्वीचा विचार केला तर सोयाबीनला कधी नव्हे एवढे विक्रमी दर मिळाला होता.

परंतु गेल्या हंगामापासून तर आतापर्यंत सोयाबीनच्या दराने निराशाच केली आहे. तसेच या हंगामाचा विचार केला तर सोयाबीन बाजारभावाची स्थिती कशी राहील? याबाबत निश्चित अजून तरी कुठला अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. परंतु जगातील सोयाबीन मार्केटवर परिणाम करणाऱ्या ब्राझील तसेच अर्जेंटिना व अमेरिका या देशांचा विचार केला तर त्या ठिकाणाचे सोयाबीनचे उत्पादन आणि पावसाची स्थिती यामुळे साधारणपणे आपण सोयाबीनच्या बाजारभावाविषयी अंदाज बांधू शकतो.

 अर्जेंटिना तसेच ब्राझील अमेरिकेतील सोयाबीनची स्थिती

 जागतिक पातळीचा विचार केला तर एकूण जगातील 80 टक्के सोयाबीनचे उत्पादन हे अर्जेंटिना, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये होते. या तीन देशांचे उत्पादनाचा जर आपण मागच्या हंगामाचा विचार केला तर ब्राझीलमध्ये सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले होते व त्या तुलनेत मात्र अमेरिका व अर्जेंटिनातील उत्पादनात घट आली होती.

या दोन्ही ठिकाणी उत्पादन घटीला दुष्काळी स्थितीचा फटका बसला होता. परंतु या वर्षी मात्र अर्जेंटिना या ठिकाणी सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होईल असा एक अंदाज आहे. कारण आपण पाहिले तर एल निनोमुळे आपल्याकडे दुष्काळी स्थिती निर्माण होते परंतु ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये या परिस्थितीमुळे चांगला पाऊस पडतो.

त्यामुळे त्या ठिकाणी या वर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल असा एक अंदाज आहे. साहजिकच जागतिक पातळीवर जर सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली तर दर देखील वाढण्याची शक्यता कमीत कमी असते. आपल्याकडील सोयाबीनच्या बाजारावर लगेच या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम व्हायला लागतो. तसेच भारतातील स्थिती पाहिली तर या ठिकाणी सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे

त्यामुळे भाव वाढण्याची देखील शक्यता आहे. आपल्याकडे उत्पादन घटले परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर उत्पादन वाढले व त्या ठिकाणी जर आपल्यापेक्षा सोयाबीनचे भाव कमी राहिले तर सरकार नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुळाशी उठण्याचा प्रकार करते व आयातीचा निर्णय देखील घेऊ शकते. कारण मागच्या वर्षी सरकारने खाद्यतेल आयात वाढवली आणि सोयाबीन आयातिला परवानगी देऊन सोयाबीनचे भाव पाडले होते.

यावर्षी देखील सरकारने मागच्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयात केली व याचा दबाव आज देखील आपल्या सोयाबीन बाजार भाव दिसून येत आहे. यंदाच्या हंगामामध्ये देशातील एकूण सोयाबीनचे उत्पादन 124 लाख टन होते व यापैकी अजून देखील 30 लाख टन सोयाबीन शिल्लक असण्याचा अंदाज या उद्योगातील जाणकारांचा आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीचा बाजारभावावर दबाव नसेल  कारण आपल्याकडे यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

या सगळे अंदाज किंवा शक्यता आहेत. परंतु ऑक्टोबर मधील जे काही उत्पादनाचे अंदाज येतील ते अचूक येण्याची शक्यता आहे व तेव्हाच हंगामातील दर पातळीविषयी व्यवस्थित किंवा नेमकेपणाने अंदाज बांधता येऊ शकतो. परंतु गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज असल्यामुळे भाव मिळण्यास चांगली स्थिती निर्माण होऊ शकते. परंतु सरकारचे धोरण शेतकरी हिताचे असणे खूप गरजेचे आहे.  त्यामुळे येणाऱ्या काळातच आपल्याला याबद्दल व्यवस्थित अंदाज येऊ शकतो.

English Summary: How do these two countries of the world affect the soybean market price in India?
Published on: 30 August 2023, 09:03 IST