जागतिक बँक अर्थ सहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे मार्फत प्रकल्पातील विविध कंत्राटी पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्प कंत्राटी पदांच्या सेवा त्रयस्थ बाहयस्त्रोत यंत्रणेमार्फत घेणार आहे. भरावयाची कंत्राटी पदे, कामाचे स्वरुप, शैक्षणिक अर्हता,
अनुभव, अर्जाचा विहित नमुना व अर्ज करण्याची पध्दती इ. बाबतची सविस्तर माहिती स्मार्ट प्रकल्पाच्या www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.पात्र इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादीबाबतच्या स्वस्वाक्षरित प्रमाणपत्रांसह अर्ज दि. १९/०८/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी खालील पत्त्यावर सादर
करावेत. उमेदवारांनी Hard copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ईमेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले soft copy मधील अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.प्रकल्प संचालक,मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प शेती महामंडळ भवन,
२७०,भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे - ४११ ०१६.दुरध्वनी क्र. ०२० २५६५६५७७ / ७८टीप : निवड झालेले कंत्राटी उमेदवार प्रकल्पाव्दारे नियुक्त त्रयस्थ बाहयस्त्रोत मनुष्यबळ पुरवठादार संस्थेच्या हजेरीपटावर राहतील व त्यांच्या सेवा त्या संस्थेमार्फत घेण्यात येतील.
(धीरज कुमार)
प्रकल्प संचालक मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
Published on: 11 August 2022, 07:09 IST