News

मुंबई आणि कोकणातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडत आहे. काल अतिपावसामुळे चेंबूर मध्ये दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. या पडणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव या पाठोपाठ विहार तलावही ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे.

Updated on 19 July, 2021 10:46 AM IST

 मुंबई आणि कोकणातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडत आहे. काल अतिपावसामुळे चेंबूर मध्ये दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. या पडणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव या पाठोपाठ विहार तलावही ओव्हरफ्लो होऊन  वाहत आहे.

 तसेच मोडक सागर, तानसा आणि अप्पर वैतरणा, भातसा डॅम यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

 मुंबईत काल विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांताक्रुज मध्ये सुमारे 234.9मिलिमीटर पाऊस पडला.तसेच मुंबईतील कल्याण, भांडुप, अंधेरी, बोरिवली या परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

तसेच  मुसळधार पावसामुळे हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रात्रभर पाऊस कोसळला नंतर सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली व काही भागांमधून पाणी कमी व्हायला सुरुवात झाली होती. या पावसाचा परिणाम हा रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. उत्तर कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये भातखाचरे भरून वाहत असून कोकणातील नद्या ही दुथडी भरून वाहत आहे.

 मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर नगर, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा इत्यादी जिल्ह्याचा इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसाचा फायदा हा वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना झाला. पश्चिम पट्ट्यातील धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कोयना, भंडारदरा, मुळा, पवना, खडकवासला, गंगापूर, उजनी या धरणाच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झालेली नाही. 

जळगाव जिल्ह्यातही अजूनही पाऊस नसल्याने पिके सुखत असल्याची स्थिती आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नांदेड, परभणी परभणी व हिंगोली जिल्ह्यासह अनेक भागात औषध ढगाळ वातावरण होतं. विदर्भात अजूनही चांगला पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पूर्व भागात मागील आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता त्यामुळे धान रोपांची लागवड या अंतिम टप्प्यात आले आहेत.

English Summary: hit by heavy rain to mumbai and konkan region
Published on: 19 July 2021, 10:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)