News

सध्या भाजीपाल्याचे दर खूपच वाढले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना टोमॅटोने तर सध्या कहरच केला आहे. पुण्यात टोमॅटोच्या दराने इतिहास रचला आहे.

Updated on 07 July, 2023 9:59 AM IST

सध्या भाजीपाल्याचे दर खूपच वाढले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना टोमॅटोने तर सध्या कहरच केला आहे. पुण्यात टोमॅटोच्या दराने इतिहास रचला आहे.

काही दिवसांपासून टोमॅटोचा भाव वाढला असल्याने किलोला १०० ते १५० रूपये दर मिळत आहे. यामुळे काही अंशी टोमॅटो उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पुण्यातील नारायणगाव येथे टोमॅटोच्या दराला उच्चांकी दर मिळाला आहे.

चांगल्या प्रतिच्या टोमॅटोच्या २० किलोच्या एका क्रेटला दोन ते अडीच हजार रुपयांचा उच्चांकी दर ठरला. २० किलोच्या टोमॅटो क्रेटचा भाव पाचशेच्या आसपास होता. यानंतर मागच्या १५ दिवसांत हा भाव वाढत गेला.

बांबूचे लाकूड का जाळत नाहीत? जाणून घ्या काय आहे सत्य..

हाच भाव आता २००० ते २५०० चा भाव मिळत आहे. जून महिन्याच्या शेवटी बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीतून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे सचिव रूपेश कवडे यांनी माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

भारतातील सर्वात महागडी म्हैस, किंमत 9 कोटी आणि वजन 1500 किलो

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीस उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीत टोमॅटोची आवक झाली होती. तुलनेने मागणी कमी झाल्याने अतिशय कमी भावात टोमॅटो विकणे भाग पडले. काही शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून दिले होते. 

पेट्रोल 15 रुपये लिटरने मिळेल, शेतकऱ्यांच्या घरात 16 लाख कोटी येतील, नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य...
राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार पुन्हा अडचणीत, जरंडेश्वर कारखान्याबाबत मोठी बातमी आली समोर..
हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

English Summary: History made by tomato price in Pune, 2500 rupees per crate...
Published on: 07 July 2023, 09:59 IST