राज्यात गाळपाचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून अनेक कारखाने जेरीस आले आहेत. मात्र, दुसरीकडे विक्रमी गाळप केल्या प्रकरणी कामगारांच्या कष्टाची जाणीव असल्याने कामगारांना बक्षिस देणारा कारखाना देखील राज्यात वाह! वाह! मिळवत आहे. पुणे जिल्ह्यातील माळेगाव कारखान्याने १५ लाख टनापेक्षा अधिक उसाचे गाळप केल्याने संचालक मंडळाने कामगारांना त्याचा मोबदला देण्याचे ठरवले आहे.
अधिकचे ऊस गाळप आणि त्याच तुलनेत उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून लक्षवेधी उत्पन्न मिळविल्याने सर्व कामगारांना पंधरा दिवसाचे वेतन बक्षिस म्हणून जाहिर केले आहे. कायम, हंगामी आणि रोजंदारीवरील सर्वच कामगारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद प्रशासनाला करावी लागणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. कामगार संचालक यांच्यासह कामगारांनी निर्णयाचे स्वागत केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली.
Rakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ
मावळत्या गळीत हंगामात १५ लाख २६ हजार ९१६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याची नोंद आहे. त्यानुसार १७ लाख ३९ हजार २०० साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. अर्थात यंदा पुर्णत्वाला आलेले गाळप माळेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक झाल्याचा विक्रम नोंदविण्यात आला आहे. त्याच बरोबर उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांमध्ये वीजेचेही उत्पन्न लक्षवेधी मिळाले आहे.
१२ कोटी ३८ लाख ५३ हजार ९०० युनिट विजेची निर्मिती झाली, त्यापैकी ७ कोटी २६ लाख १५ हजार १२० युनिट विज विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच तुलनेत चांगली स्थिती डिस्टलरी प्रकल्पाच्या माध्यमातून दिसून आली. या प्रकल्पामध्ये यंदा अल्कोहल १ कोटी ८६ लाख ७ हजार ९१४ लिटर मिळाले आहे. तसेच इथेनाॅलही १ कोटी ३४ लाख ६८ हजार ९०२ लिटर निर्माण झाले आहे.
वाह रं छोट्या उस्ताद! वयवर्षे 10, अवघ्या 26 मिनिटात 1000 जोर मारण्याचा विक्रम
या उत्पन्नावर कारखाना प्रशासन यशस्वी झाल्याने संचालक मंडळाने कामगारांना १५ दिवसांचे वेतन बक्षिस म्हणून देण्याचे जाहिर केले, अशी माहिती कार्य़कारी संचालक यांनी दिली. दुसरीकडे, माळेगावने आजवर कामगारांबरोबर सभासदांनाही अधिकचे दोन पैसे देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. एफआरपीही एकरकमी दिली आहे. निश्चितपणे मावळत्या हंगामाच्या पार्श्वभूमिवर सभासदांनाही अधिकाधिक ऊस दर देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील असे ही सांगण्यात येते आहे.
Published on: 30 May 2022, 05:44 IST