हिंगोली जिल्हा तसा पाहायला गेले तर बागायती जिल्हा म्हणून ओळखले जाते, कारण तिकडे पाण्याचा स्रोत सुद्धा चांगला आहे आणि तिकडचे लोक शुद्ध चांगल्या प्रकारे शेती करतात.जास्तीत जास्त फळबागांचे क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते जसे की केळी असो किंवा डाळिंबीची बाग. मागील दोन दिवसात आपल्याला असे पाहायला भेटले की हिंगोलीच्या केळीला इराक आणि इराण मधून मागणी आलेली आहे.
जे की मोठ्या प्रमाणावर हिंगोलीमधून केळी इराक इराण अशा देशांना पाठवले जाते. जास्तीत जास्त प्रमाणात तेथील शेतकरी शेतीत केळीची लागवड करतात.
हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथे राहणारे सुधाकर नादरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जेव्हा या शेतकऱ्याची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की मागील काही वर्षांपासून त्यांनी केळीची बाग लावली आहे, कमीत कमी पाच हजार केळीची झाडे आहे.
हेही वाचा:महाराष्ट्र सरकारने सादर केले नवीन कृषी विधेयक, जाणून घेऊ काय आहे हे विधेयक?
पण आपल्या देशात केळीला बाजारभाव नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या देशात केळी पाठवतो. बाहेरच्या देशात केळीला चांगला बाजारभाव भेटल्याने आम्हाला चांगला फायदा होतो असे त्यांनी सांगितले आहे. तेथील अजून काही शेतकरी सुद्धा त्यांची सुद्धा केळी बाहेरचया देशात पाठवत असल्याचे सांगितले गेले आहे. सुधाकर नादरे त्यांच्या शेतातील केळी इराक, इराण अशा बाहेरच्या देशात पाठवतात.सुधाकर नादरे यांनी असेही सांगितले कि केळी जर उत्तम प्रकारची असेल तरच केळी आपण बाहेरच्या देशात पाठवू शकतो त्यामुळे आम्ही केळीच्या बागेची चांगली काळजी घेतो तसेच उत्तम प्रकारच्या केळी आम्ही पिकवतो
जेवढा भाव बाजारात नाही तेवढा भाव आम्हाला असं भेटतो जसे की प्रति क्विंटल १३०० रुपये भावाने आमची केळी जाते असे सांगितले आहे. त्यामुळे गिरगाव गावातील सुधाकर नादरे या शेतकऱ्याचा आदर्श अनेक शेतकऱ्यांनी घेतला असून ते सुद्धा लोक चांगल्या प्रकारच्या केळीचे उत्पादन करून त्याचा सुद्धा माल बाहेरच्या देशात पाठवत आहेत.
Published on: 07 July 2021, 09:09 IST