News

मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत महाराष्ट्रातील पुणे, नासिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे जिल्ह्यातील फळपिकांचे व शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते.

Updated on 07 October, 2021 3:10 PM IST

 मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत महाराष्ट्रातील पुणे, नासिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील  जिल्ह्यांमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे जिल्ह्यातील फळपिकांचे व शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते.

 या पार्श्वभूमीवर झालेल्या या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतात पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी 122 कोटी 26 लाख तीस हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांची यामध्ये ते 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

 झालेली गारपीट व अवकाळी पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप विभागनिहाय खाली पाहू.

 

  • पुणे विभाग- तीन कोटी 16 लाख 75 हजार रुपये
  • नाशिक विभाग- 59 कोटी 36 लाख 34 हजार रुपये
  • औरंगाबाद विभाग- 15 कोटी 51 लाख 54 हजार रुपये
  • अमरावती विभाग- 38 कोटी 87 लाख 56 हजार
  • नागपूर विभाग- पाच कोटी चार लाख 81 हजार रुपये

 

इतका निधी मंजूर झाला आहे.

 गारपीट व अवेळी  पडलेल्या पावसामुळे कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती,नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे व फळबागांचे फार नुकसान झाले होते. भीषण परिस्थितीची माहिती मिळताच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीनेनुकसान ग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासित केले होते.

English Summary: hevy rain and icefall effected farmer cmpansation package approvel
Published on: 07 October 2021, 03:10 IST