26 नोव्हेंबर पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजारांची तात्काळ मदत करा, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी सरकारला दिला आहे.
पिक विमा कंपन्यांकडूनही मदत मिळत नाही, गेल्या वेळेच्या गारपीटीची देखील मदत सरकारने केली नाही, शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडून सरकार बाहेर मौज मजा करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, पण तसे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार अधिवेशन चालू देणार नाही, असे राऊत म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा आणि बटाटा पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमधील वेचणीला आलेला कापूस पावसामुळे पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यालातील फळबागांना गारपिटीचा फटका बसला आहे. मागील हंगामात पुरेसा पाऊल न झाल्याने दुष्काळसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील हंगामात जास्त पिक आलं नाही. आणि आता रब्बी हंगामात चांगल्या उत्पनाची अपेक्षा असताना या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजारांची तात्काळ मदत करा, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी सरकारला दिला आहे.
Published on: 29 November 2023, 04:12 IST