1. बातम्या

खरीप कांद्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ, संबंधित प्रोजेक्टला भारत सरकारची मदत

भारत सरकार मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर (एमआयडीएच ) च्या माध्यमातून खरीप कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. भारतातील पाच राज्यांना सरकारने एक खास प्रोजेक्ट दिला आहे. या राज्यांमध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. कांद्याच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या दिशेने अधिक जोर दिला जात आहे आणि याच उद्देशाने या मिशनची सुरुवात करण्यात आली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
onion cultivation

onion cultivation

 भारत सरकार मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर (एमआयडीएच ) च्या माध्यमातून खरीप कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे.  भारतातील पाच राज्यांना सरकारने एक खास प्रोजेक्ट दिला आहे. या राज्यांमध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. कांद्याच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या दिशेने अधिक जोर दिला जात आहे आणि याच उद्देशाने या मिशनची  सुरुवात करण्यात आली आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अनुसंधान आणि अनुसंधान विकास प्रतिष्ठान नवी दिल्ली चे निदेशक डॉ. पी के गुप्ता यांनी सांगितले की, हा काळ खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी योग्य काळ आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या प्रगत जातींची निवड करणे आवश्यक आहे. एन एच आर डी एफ ने कांद्याची एक वैशिष्ट्यपूर्ण जात विकसित केली आहे ती खूपच चांगली आहे. शेतकऱ्यांनी या जातीचा वापर करणे आवश्यक आहे.

 कांद्यासाठी या जाती वापरण्याचा सल्ला देतात कृषी वैज्ञानिक

 ऍग्री फाउंड डार्क रेड ही कांद्याची जात जवळ जवळ 80 ते 100 दिवसात तयार होते. त्यानंतर दुसरी जात आहे लाईन 883 ही जात सुद्धा एन एच आर डी एफ ने विकसित केले आहे. पुढे बोलताना गुप्ता यांनी सांगितले की, भारतामध्ये या जातीची उपलब्धता फारच कमी आहे परंतु शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने  शोध घेतला तर ही जरूर मिळते. लाईन 883 ही जात फक्त 75 दिवसांमध्ये तयार होते. खरीप कांद्यासाठी ची रोपवाटिका तयार करताना विशेष गोष्टीवर लक्ष द्यावे लागते. कारण तेव्हा तापमान जास्त असते आणि अचानक पाऊस झाला तर त्याचा विपरीत परिणाम रोपवाटिका वर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की रोपवाटिका तयार करण्याच्या अगोदर शेती व्यवस्थित पद्धतीने तयार करून घ्यावी जेणेकरून विकृत परिस्थितीमध्ये सुद्धा कांद्याची रोपे विपरीत  परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम असतील.

 गुप्ता यांनी सांगितले की ऍग्री फाईड डार्क रेड जातीच्या कांद्याची रोपवाटिका टाकण्यासाठी हेक्‍टरी सात ते आठ किलो बियाणे लागते. तसेच लाइन 883, भीमा रेड आणि पुसा रेड या जातींचा सुद्धा शेतकरी वापर करू शकतात. भक्ती गुप्ता यांनी सल्ला दिला की शेतकरी  तेव्हाही कांद्याचे बियाणे खरेदी करतील ते विकत घेताना सरकारी संस्थांकडून घेणे किंवा चांगल्या खाजगी कंपन्यांचे बियाणं खरेदी करणे फायद्याचे असते.

जे बियाणे महाग असतात परंतु पुढे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये त्यासाठी आवश्यक असतं. कांदा पिकाच्या जास्त उत्पादनासाठी रोपवाटिका सशक्त असणे फार गरजेचे असते. खरीप कांदा हा ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तयार होतो आणि तेव्हा कांद्याचा भाव हा 40 ते 50 रुपये प्रति किलो राहतो. याच कारणामुळे शेतकऱ्यांना खरीप कांद्याच्या शेतीमुळे चांगला उत्पन्न मिळू शकते.

 हरियाणा सरकार देते प्रति एकर आठ हजार रुपये

 हरियाणा सरकार शेतकऱ्यांना खरीप कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात प्रति एकरी आठ हजार रुपये प्रमाणे अनुदान देते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना खरीप कांद्याचे उत्पन्न तर मिळतेच परंतु सरकारकडून मिळालेल्या अनुदान राशि मुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. या धनराशी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या सबसिडीचा फायदा मिळतो.

English Summary: help of central gov. to kharip onion cuitivation Published on: 05 July 2021, 05:20 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters