नाशिक: जर आपण मागील काही वर्षांचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये गोदावरीचे नदीपात्र अनेक कारणांनी संकुचित होत आहे.तसेच नदी किनाऱ्याला लागून मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्यामुळे नेमके गोदावरीला आलेल्या पुरामुळे नेमक्या कोणत्या भागाला फटका बसू शकतो,
यासंबंधीचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाची मदत घेऊन नाशिक महापालिकेने सुरू केली असून जलसंपदा विभागातील 'हेक रास' सॉफ्टवेअरच्या मदतीने निळा व लाल पुरा रेषेमधील पाणीपातळी नेमके किती व त्यापेक्षाही अधिक पाणी वाढल्यास कोण कोणता भागाला जास्त फटका बसण्याची शक्यता निर्माण होईल
या दृष्टिकोनातून महापालिका आता रेखांकन करणार आहे. त्यानंतर कंटूर ड्रॉइंग मॅप च्या मदतीने नगररचना विभाग पाण्याच्या वाढत्या पातळीनुसार कोणकोणत्या भागातील घरे पुरामुळे बाधित होऊ शकतात याचा आराखडा तयार केला जाणार आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो काळजी घ्या, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार
आठ दिवसात अहवाल
याबाबत महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाकडे 'हेक रास' सॉफ्टवेअर असून यापूर्वी त्यांनी त्याचा वापर करून निळी व लाल पूररेषा निश्चित केले आहे.
या विभागाला महापालिकेने पत्र दिली असून 'हेक रास' या सॉफ्टवेअरचा वापर करून सद्यस्थितीमध्ये गोदावरीची पूर पातळी नेमकी किती हे निश्चित केले जाणार असून त्यानुसार रेखांकन केले जाणार आहे.
रेखांकन केलेल्या सर्व पॉईंट्स एकत्र करून कंट्रोल मॅप तयार केला जाईल व त्यानुसार नगररचना विभागा गोदावरीच्या पाणीपातळी नुसार कोणत्या भागामध्ये पाणी घुसू शकते व किती घरे पाण्याखाली जाऊ शकतात याचा सविस्तर आराखडा तयार करेल.
नक्की वाचा:राज्यात पावसाचा धुमाकूळ, 30 धरणे भरली, शेतकऱ्यांची काळजी मिटली..
नक्की वाचा:नोकरीला करा रामराम ! सुरु करा हा शेती व्यवसाय आणि कमवा करोडो
Published on: 18 July 2022, 09:31 IST