News

राज्यात 26 नोव्हेंबर पासून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वादळीवाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पाऊसाने काही ठिकाणी नदी नाल्यांना पुरही आले आहेत.

Updated on 04 December, 2023 12:36 PM IST

राज्यात 26 नोव्हेंबर पासून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वादळीवाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पाऊसाने काही ठिकाणी नदी नाल्यांना पुरही आले आहेत.

परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वादळीवा-यास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला होता.या पाऊसाने काही ठिकाणी नदी नाल्यांना पुरही आले.हा अवकाळी पाऊस पडून सहा दिवस उलटून जात असतानाही ज्या भागात पाऊस झाला त्या ठिकाणच्या नदीवरील बंधारे पाण्याने अजूनही ओव्हरफ्लो झाल्याचे पहायला मिळत आहे.

या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र येणाऱ्या हंगामासाठी परभणी जिल्ह्यांतील नदी नाल्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या हंगामात झालेले नुकसान येणाऱ्या हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

English Summary: Heavy rains in Parbhani district, rivers overflowed
Published on: 04 December 2023, 12:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)