कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही हलक्या पावसाची संततधार आहे. मागील आठवड्यात कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यातील २४ बंधारे अजूनही पाण्याखालीच आहेत.
कोल्हापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जवळपास ८३ बंधारे पाण्याखाली गेले होते. नद्यांनी देखील इशारा पातळी गाठली होती. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
राधानगरी धरणाचे अद्यापही २ दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रात ४ हजार २५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
English Summary: Heavy rains in Kolhapur 24 dams still under water Rain Update
Published on: 02 August 2023, 02:01 IST
Published on: 02 August 2023, 02:01 IST