पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा पश्चिम किनारी भागात सक्रिय होणार असून त्याचा जोर पुढचे सात ते आठ दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान निरीक्षणानुसार पुढच्या एक ते दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. संबंध कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मगच मागच्या आठवड्यात दिवस पडलेल्या पावसामुळे मुंबई अक्षरशः तुंबली होती. आता जर पुन्हा पाऊस चालू झाला तर तशीच परिस्थिती उदभवू शकते.
जर हा पाउस पूण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास मुंबई आणि घाटमाथावरील पिण्याच्या प्रश्न निकाली निघू शकतो. काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यावर अनेक शहरात पाणीकपात लागू झाली होती. आता अनेक धरणांचा साठा ५०% च्या पुढे गेला आहे. मध्य प्रदेशाच्या नैत्रऋ भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीव आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार उत्तर भागात वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर , जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामिळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
Published on: 10 August 2020, 07:37 IST