रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात काही भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.असं असलं तरी पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. मात्र काही भागात उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे.
अमरावतीत पावसाला अशी काही सुरुवात झाली की यात सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याच्याच नशिबी आले आहे. अमरावतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वकाही मातीमोल झाल्याचं चित्र दिसत आहे. नेहमीप्रमाणेच या बाजार समितीमध्ये शेतीमाल दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मात्र सौदे होण्याआधीच पावसाने हजेरी लावली यामध्ये शेतकऱ्यांचे शेतमालाचे मात्र बरेच नुकसान झाले.
त्यातल्या त्यात मुसळधार पावसाने शेतकरीही काही करू शकले नाहीत. एवढंच नाही तर शेतमालाबरोबर व्यापारांच्या साठवलेल्या मालाचेही बरेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाचवण्यासाठी बरीच धडपड केली. मात्र अवघ्या 15 मिनिट बरसलेल्या पावसाने सगळंकाही मातीमोल केलं आहे. पावसामुळे पोत्यांसह परिसरात साठवलेल्या मालातही पाणी साचले. त्यामुळे हा बरसलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी हानिकारकच आहे.
महाराष्ट्रातून खताची तस्करी करणा-यांचा पर्दाफाश; ट्रक चालक अटकेत
बाजार समितीमधील मालमत्ता सुरक्षतेचा प्रश्न
अमरावती बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात होते. असं असतानासुद्धा शेतमालाच्या सुरक्षेतेबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. शेतमाल सुरक्षित ठेवण्याचीही या समितीमध्ये सोय नाही. वावरामधील पीक जसे उघड्यावर आहे तीच अवस्था बाजार समितीमध्ये आहे. व्यापाऱ्यांकडे साठवणुकीसाठी गोदामाची सोय आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सुरक्षतेची दखल प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
"शेतकऱ्यांनो आता पेट्रोल, डिझेलच्या गाड्या घेऊ नका"; नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
आता बोगस मतदार ओळखपत्रांचा होणार पर्दाफाश; निवडणूक प्रक्रियेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय
Published on: 18 June 2022, 04:43 IST