गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील हवामान सतत बदलत राहत आहे त्यामुळे अनेक समस्या आणि अडचनी उदभवू लागल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडकडाट वाढत चालला आहे. नेहमी ढगाळ वातावरण आणि धुक्याचे चित्र दिवसभर राहत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील धुळ्याचा पारा हा 3 अशांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे थंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवकाळी पासून बळीराजाला सतत नुकसान सहन करावे लागत असल्याने बळीराजा सुद्धा व्याकुळ झाला आहे.
कधी आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता:-
नैसर्गिक संकटामुळे यंदाचे वर्ष हे बळीराजा साठी पोषक नव्हते .तसेच बदलत्या वातावरणामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसाधी लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात गारांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला तसेच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता.

शेतकऱ्यांमध्ये मध्ये भीतीचे वातावरण:-
अवकाळी पासून बळीराजावर संकटाची मालिका कायम आहे. शेतकरी वर्गाला नेहमी वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगराई पसरत आहे तसेच थंडीमुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजमुळे बळीराजावर भीतीचे संकट ओढवले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
सध्या हातामुखाला आलेली पिके पावसामुळे खराब होतील या भीतीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी होईल असा अंदाज सुद्धा शेतकरी वर्गाला आहे. सर्वात मोठे नुकसान हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होईल असा अंदाज आहे.
Published on: 31 January 2022, 11:42 IST