News

मॉन्सूनने राज्य व्यापले आहे, पण बहुतांश भागात उडीप झालेली दिसत आहे. राज्यात ढगाळ आकाश, कोरड्या हवामानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे.

Updated on 22 June, 2020 3:17 PM IST

मॉन्सूनने राज्य व्यापले आहे, पण बहुतांश भागात उडीप झालेली दिसत आहे. राज्यात ढगाळ आकाश, कोरड्या हवामानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी  तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने  वर्तवला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. यातच उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पुरक ठरल्याने पूर्वेकडून वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरावरुन बाष्पाचा पुरवटा होणार आहे. त्यामुळे आजपासून पूर्व आणि मध्य भारतात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान उत्तरी ओडिशा आणि शेजारील परिसरात चक्रीय वातावरण बनले आहे. हवामान विभागाच्या मते २३ जून पर्यंत उत्तराखंडसह प्रदेशातील बहुतांश भाग पोहोचला. तर दिल्लीत रविवारी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या मते चक्रीय वातावरणामुळे पूर्वेकडून चालणाऱ्या हवेमुळे आणि बंगालच्या खाडीमध्ये कमी दाब असल्याने पुढील तीन दिवसात उत्तर भारतात मॉन्सून पोहोचेल. दक्षिण पश्चिम मॉन्सून मध्य प्रदेश आणि यूपीच्या इतर भागात उद्यापर्यत मॉन्सून पोहोचणार आहे. 

दरम्यान अरबी समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील येथे २५ मिलीमीटर, मराठवाड्यातील कळमनुरी येथे २२ मिलीमीटर, मंथा ३४ चाकूर ३२, नांदेड २८, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात कोरड्या हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

English Summary: heavy rainfall will be eastern and central india ; in state lightweight
Published on: 22 June 2020, 03:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)