News

मॉन्सूनने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर रविवारी मॉन्सून परत बॅक टू एक्शनवर आला आहे. रविवारीच्या सकाळपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार, तर कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी पावासाने हजेरी लावली

Updated on 29 June, 2020 2:16 PM IST

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर रविवारी मॉन्सून परत बॅक टू एक्शनवर आला आहे. रविवारीच्या सकाळपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार, तर कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी पावासाने हजेरी लावली आहे.  या पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले असून धरणसाठ्यातही वाढ होत आहे. मराठावाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास सर्व भागात हलका ते जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यातील तीन व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. औरंगाबाद, जालना, जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. 

दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. शेतात पाणी तुंबले आहे. दरम्यान काही भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी तुंबल्याने आणि अति पाऊस झाल्याने शेतातील उगवलेली पिके वाहून गेली आहेत.  नगर जिल्ह्याच्या अनेक भागात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. जिल्ह्यात यंदाा १८१.१४ टक्के पाऊस झाला आहे. नगर तालुक्यात सर्वाधिक १५० टक्के पाऊस झाला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी सुखावला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात देखील दमदार पाऊस झाला आहे. येथील घटप्रभा नदीवरील फाटवाडी प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. दोन दिवसापुर्वीच प्रकल्पाच्या पाणी पातळीने पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला.

English Summary: heavy rainfall in marathwada and central maharashtra
Published on: 29 June 2020, 02:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)