यावर्षी राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच राज्यात पावसाने अतिशय उशिराने एन्ट्री मारली. त्यानंतर पाऊस चांगलाच बरसला. काही दिवस बरसला.
त्यानंतर पुन्हा त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर तो पुन्हा आला. पण नंतर ऑगस्ट महिन्यात त्याने जी सुट्टी घेतली तो शेवटपर्यंत आलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. आता मात्र परतीच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना चांगला दिलासा मिळाला. मात्र अजूनही पावसाची गरज आहे.
दरम्यान, मागील आठवड्यापासून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. याबाबत हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे
असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या दोन-तीन दिवसांत परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका पाऊस पडू शकतो.
पुणे, मुंबईसह नागपुरमधून मान्सून परतला आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले असून प्रत्येक वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होतो. यंदा मात्र मान्सूनने आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू केला आहे.
शेतकऱ्याचा संकल्प, 12 वर्ष घातली नाही चप्पल; जाणून घ्या काय होता शेतकऱ्यांचा संकल्प
Published on: 07 October 2023, 11:57 IST