Heavy Rain: राज्यात परतीच्या पावसाने (Rain) अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने (Heavy Rain) खरिपातील पिके (Kharip Crop) पाण्याखाली गेली आहेत. तसेच काढणी केलेल्या पिकांना कोंब फुटू लागले आहेत. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
राज्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सोयाबीन (Soyabean), कापूस, मूग पिकासह इतर भाजीपाला आणि द्राक्ष बागायतदारांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास मुसळधार पावसाने हिसकावून घेतला आहे.
नांदेड (Nanded) जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तरीही अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हदगाव तालुक्यातील मनाठा, भाटेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. या परतीच्या धुव्वाधार पावसामुळं सोयाबीनसह,उडीद, मूग ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उमरी, बिलोली ,अर्धापुर, भोकर, नायगाव, माहूर, किनवट,मुखेड, मुदखेड ,धर्माबाद व देगलूर या सर्व तालुक्यात परतीच्या पावसानं अक्षरशः कहर केला आहे. कारण गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे.
गव्हाच्या या देशी वाणाची योग्य वेळी पेरणी केली तर कराल मोठी कमाई; पावसातही राहते सुरक्षित
बीड (Beed) जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रीपासूनच वडवणी तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात गेले आहे.
शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली पिके पावसात भिजल्याने आणि वाहून गेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.
हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि बंपर उत्पन्न कमवा; आरोग्यासही आहेत लाभदायक
लातूर (Latur) शहरातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग पाच दिवस पडणाऱ्या पावसाने लातूरमधील शेतकऱ्यांची तारांबळ उडवली आहे. खरिपातील काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे पिके खराब होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे.
संततधार पावसामुळे उरलेल्या पिकांची काढणी शेतकऱ्यांना करता येत नाही. तसेच ही पिकेही पावसाने खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच सरकारडून अजूनही काही मदत मिळत नसल्याने दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! या रोगापासून करा लिंबाचा बचाव अन्यथा होईल मोठे नुकसान
शेतकऱ्यांना भीक नको, कुत्रे आवरा... रक्षकच झाले भक्षक! जिल्ह्याधिकारी कार्यालयावर शेतकऱ्याने लावलं पोस्टर
Published on: 14 October 2022, 05:39 IST