नाशिक जिल्ह्यातील निफाड, सटाणा सहा जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही भागाला शनिवारी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मालेगाव तालुक्यामधील उंबरदे, नरडाणे आणि कळवाडी शिवारात गारपिटीने सुमारे तीनशे एकर वरील कांदा व डाळिंबाचे नुकसान केले.
नाशिक जिल्ह्यात आणि तालुक्यात द्राक्ष आणि उन्हाळ कांदा काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकरी संकटामध्ये सापडला आहे.जर कांद्याच्या दराचा आणि द्राक्षांचा दराचा बाजारपेठेतील भावाचा विचार केला तर अगोदरच भाव फार प्रमाणात घसरले आहेत, त्यामुळे शेतकरी अगोदरच संकटात असताना या मोसमी पावसामुळे त्यात भर पडली आहे.
मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात शनिवारी साडे चार वाजेच्या सुमारास बेमोसमी पाऊस गारपीट झाली. त्या तालुक्यातील काही भागात वादळी वारा, विजा सह पाऊस झाला. काढणी वर आलेल्या कांद्याचे पाच गारपिटीमुळे ठोकली गेली. त्यामुळे गारपिटीने कांदा सडणार हे निश्चित आहे. उन्हाळी पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र शनिवारी दुपारी जिल्ह्यातील पिंपळगाव, वाखारी, जायखेडा, नामपुर, पिंपळकोठा, ताहाराबाद या भागात अवकाळी पाऊस झाला.
Published on: 22 March 2021, 07:10 IST