Marathawada Rain News :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल (दि.२६) रोजी हिंगोलीत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचं नुकसान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे शहरात आणि इतर भागात साचल्याचे पाहायल मिळालं आहे. या झालेल्या पावसामुळे विहीरी आणि बोअरवेल यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी देखील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे.
हिंगोली जिल्ह्यात देखील मंगळवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यांच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोरी सावंत, हापसापुर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांना सुद्धा पावसाचा फटका बसला आहे.
दरम्यान, हिंगोली जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत पिकात पाणी साचले आहे. अनेक भागातील खरीपाची पिके काढणीसाठी आली होती. त्यातच पावसाने तांडव केल्याने शेत पिकांत पाणी साचले आहे. यामुळे पिकांच नुकसान झालं आहे.
Published on: 27 September 2023, 01:24 IST