News

सध्या बारामती तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील सुपेमध्ये सकल भागात पाणी साठले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

Updated on 13 October, 2022 4:33 PM IST

सध्या बारामती तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील सुपेमध्ये सकल भागात पाणी साठले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

यामध्ये सुपे ११०, वडगाव निंबाळकर ११८, मुर्टी १२७ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. जिरायती पट्ट्यात पडलेला हा पाऊस आश्‍चर्यकारक मानला जात आहे. बारामती तालुक्यातील बहुतांश गावांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे.

सुप्यातील मुख्य चौकामध्ये सकल भागात पाणी साठले होते. येथील रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. आता पाऊस थांबला पाहिजे, अन्यथा पिकांची नासाडी होणार आहे.

रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी मागणीपेक्षा डीएपी ४४ टक्के कमी आणि युरिया २८ टक्के कमी, शेतकरी चिंतेत

या पावसामुळे ओढे नाले देखील ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाने शेतात पाणी साठले कांदा आणि बाजरीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. अचानक मोठा पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती.

लम्पीकडे दुर्लक्ष, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र

दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. बारामतीमधील पश्चिम भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं असून, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या;
सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण, शेतकऱ्यांची चिंता वाढली..
पुण्यात तीन दिवसीय डेअरी कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांनो एकदा भेट द्याच

English Summary: Heavy rain in Baramati, huge loss to farmers
Published on: 13 October 2022, 04:33 IST