News

भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण,मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Updated on 04 October, 2021 9:02 PM IST

भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण,मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील चार-पाच दिवसातराज्यातकाही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा इशारा जारी केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

.त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र,विदर्भआणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे.राज्यात या वर्षी जास्त पाऊस पडलाआहे.चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला.या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त आहे. अजूनही काही ठिकाणी पाऊस होत आहे.आता हवामान विभागाने आणखी चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानेचिंता वाढल्या आहेत.

 हवामान विभागाकडून यलो अलर्ट

 

 5 ऑक्टोबर-रायगड,रत्नागिरी, कोल्हापूर,सातारा,पुणे,अहमदनगर, नाशिक,उस्मानाबाद, बीड,औरंगाबाद,जालना,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर,भंडारा,  गोंदिया इत्यादी जिल्हे

 6 ऑक्टोबर -रायगड, रत्नागिरी, सातारा,पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे

 सात आक्टोबर रायगड, रत्नागिरी,कोल्हापूर,सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे

English Summary: heavy rain fall will next four dayd guess of meterological department
Published on: 04 October 2021, 09:02 IST