News

यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोराचा झटका दिला आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका देशातील विशेषता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसत आहे. यावर्षी सुरवातीला अतिवृष्टीने हाहाकार माजवला आणि खरीपमधील पिकांची पुरती वाट लावून टाकली. अतिवृष्टीने आणि अवकाळी पावसाने यंदा जवळपास सर्वच पिकांची नासाडी केली आहे, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 28 November, 2021 3:34 PM IST

यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोराचा झटका दिला आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका देशातील विशेषता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसत आहे. यावर्षी सुरवातीला अतिवृष्टीने हाहाकार माजवला आणि खरीपमधील पिकांची पुरती वाट लावून टाकली. अतिवृष्टीने आणि अवकाळी पावसाने यंदा जवळपास सर्वच पिकांची नासाडी केली आहे, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

ज्याप्रमाणे अतिवृष्टीने खरीपचा हंगाम बर्बाद केला तसंच आता अवकाळी पाऊस रब्बीचा हंगाम बर्बाद करत आहे. ह्या बेमौसमी पावसाने आधी खान्देशमध्ये, विदर्भमध्ये हाहाकार माजवला आणि मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची नासाडी केली. आता हा अवकाळी पाऊस कोकणात फळबाग पिकांचे नुकसान करत आहे. कोकण हे फळबागसाठी ओळखले जाते, येथे आंबा, काजु, नारळ इत्यादी पिकांची मोठया प्रमाणात शेती केली जाते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात यामुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील फळबागा ह्या पावसामुळे चांगल्या प्रभावित होत आहेत. ह्याचे फलस्वरूप उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट घडून येण्याचे चित्र दिसत आहे. मागच्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, तर शुक्रवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे जिल्ह्यातील आंब्याच्या आणि काजूच्या बागा संकटात सापडल्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी वैज्ञानिकांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

जिल्ह्यात मोठया प्रमाणात आंब्याच्या आणि काजूच्या बागा आपणास पाहवयास मिळतील. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी या बागासाठी बक्कळ पैसा खर्च केला आहे. परंतु निसर्गाच्या या लहरीपणामुळे फळबाग लागवड केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत.

कृषी वैज्ञानिकांनी काय दिला सल्ला

अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजूच्या बागांचे नुकसान होत आहे. ह्या अवकाळी पावसामुळे फळबागांना ग्रहण लागेल असे चित्र दिसत आहे. 

पावसाच्या या अनियमित येण्याने फळबाग पिकावर अनेक प्रकारचे रोग येण्याचे संकेत दिसत आहेत. फळबाग पिकावर किडिंचा आणि बुरशीचा हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणुन कृषी वैज्ञानिकांनी सल्ला दिला आहे की, पाऊस थांबताच सर्व्यात आधी बागांवर कीटकनाशकची फवारणी करावी. ह्या अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडत आहे तर काजूचे पीक हे करपून जात आहे. त्यामुळे ह्यावर वेळीच कीटकनाशक फवारणी केली गेली तर होणारं नुकसान टाळले जाऊ शकते.

English Summary: heavy rain destroy cashew and mango orchard give some advice agri scientist to farmer
Published on: 28 November 2021, 03:34 IST